जागतिक क्षयरोग दिनानिमित्त प्रश्नमंजूषा स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:26 AM2021-03-28T04:26:48+5:302021-03-28T04:26:48+5:30

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा क्षयरोग केंद्र येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गोवर्धन दुधे, जिल्हा क्षयरोग अधिकारी ...

Quiz competition on the occasion of World Tuberculosis Day | जागतिक क्षयरोग दिनानिमित्त प्रश्नमंजूषा स्पर्धा

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त प्रश्नमंजूषा स्पर्धा

Next

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा क्षयरोग केंद्र येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गोवर्धन दुधे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठे, डॉ. सौरभ राजुरकर, राष्ट्रीय आरोग्य मिशनचे श्रीनिवास मुळावार उपस्थित होते. डॉ. रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेला मालार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांना मास्क वाटप करून क्षयरोगाची शपथ देण्यात आली.

यावेळी डॉ. प्रकाश साठे, डॉ. सौरभ राजुरकर व डॉ. गोवर्धन दुधे यांनी क्षयरोगावर मार्गदर्शन केले. तसेच एमडीआर रुग्णाबाबत माहिती दिली. क्षयरोग कार्यक्रमावर उत्कृष्ट सहकार्य करणाऱ्या अशासकीय संस्था तसेच जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यशस्वीतेसाठी जिल्हा क्षयरोग केंद्र, चंद्रपूर येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

---------

व्यवसाय परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र उपलब्ध

चंद्रपूर : एप्रिल-२०१७, नोव्हेंबर २०१७ व एप्रिल -२०१८ मध्ये शिकाऊ उमेदवारी अंतर्गत अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेत बसून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे अंतिम प्रमाणपत्र उपलब्ध झाले आहेत. प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी संबंधित उमेदवारांनी प्रोव्हिजनल मार्कशीट, करारपत्राची प्रत तसेच प्रशिक्षण कालावधीमध्ये कंपनी/ आस्थापनेकडून मिळालेल्या स्टायपेंडचा पुरावा म्हणून बॅक स्टेटमेंट अथवा बँक पासबुकाची झेरॉक्स कॉपी दोन प्रतीत मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, द्वारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर या कार्यालयात जमा करण्यात यावे, असे संस्थेचे अंशकालीन प्राचार्य यांनी कळविले आहे.

Web Title: Quiz competition on the occasion of World Tuberculosis Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.