गुलबर्गा विद्यापिठातून आलेले १२ विद्यार्थी चंद्रपुरात राहत्या घरी देखरेखीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 03:46 PM2020-03-16T15:46:44+5:302020-03-16T15:48:13+5:30
कर्नाटक राज्यातील गुलबर्गा विद्यापीठात शिक्षण घेणारे चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल १७ पैकी १२ विद्यार्थी स्वगृही परतले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासस्थानी देखरेखीखाली ठेवले असून आरोग्य विभागाची यंत्रणा त्यांची काळजी घेत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नसला तरी बाहेरून येणाऱ्या संशयितांची संख्या वाढीवर असल्यामुळे जिल्हा कोरोना व्हायरसच्या सावटाखाली आहे. अशातच कर्नाटक राज्यातील गुलबर्गा विद्यापीठात शिक्षण घेणारे चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल १७ पैकी १२ विद्यार्थी स्वगृही परतले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासस्थानी देखरेखीखाली ठेवले असून आरोग्य विभागाची यंत्रणा त्यांची काळजी घेत आहे. पुन्हा सोलापूर जिल्ह्यातील केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्रात ठेवलेले विदभार्तील १५ विद्यार्थी परत येणार आहेत. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ५, वर्धा जिल्ह्यातील ६ तसेच नागपूर व गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येकी २ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल १७ विद्यार्थी कर्नाटक राज्यातील गुलबर्गा या विद्यापिठात शिक्षण घेत आहेत. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण हा कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आढळला होता. भारतात कोरोनामुळे दगावलेला पहिला रुग्णही गुलबर्गा येथील आहे. यामुळे येथील प्रत्येकाची सरकार काळजी घेत आहेत. गुलबर्गा विद्यापीठात देशभरातील अनेक विद्यार्थी शिकत आहेत. हे विद्यार्थी स्वगृही परतत आहे. त्यांची काळजी घेण्याची सूचना सरकारने संबंधित जिल्हा प्रशासनाला दिलेली आहे. या विद्यापीठात १७ विद्यार्थी हे चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. त्यातील १२ विद्यार्थी हे १५ मार्चपूर्वी जिल्ह्यात पोहचले आहे. यामध्ये राजुरा तालुक्यातील ८, बल्लारपूर २ व भद्रावती व नागभीड तालुक्यातील प्रत्येकी एका विद्याथ्यार्चा सामावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात परत येणा?्या ५ विद्यार्थ्यांमध्ये चंद्रपूर येथील १ व राजुरा येथील ४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्याच घरी आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली ठेवण्याच्या सूचना आहे. यानुसार जिल्ह्यातील आरोग्य विभागाची यंत्रणा कर्तव्य बजावत आहे.