पाऊस व संभाव्य परिस्थितीवर रबीचे नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:06 AM2017-09-29T00:06:01+5:302017-09-29T00:06:10+5:30

जिल्ह्यात यावर्षी पावसाने दडी मारल्याने खरीपामधील पिकांना धोका निर्माण झाला आहे. मात्र उपलब्ध जलसाठे आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कृषी, सिंचन व अन्य विभागाने समन्वयाने रबी हंगामाचे नियोजन करावे, ...

Rabi planning on rain and possible conditions | पाऊस व संभाव्य परिस्थितीवर रबीचे नियोजन करा

पाऊस व संभाव्य परिस्थितीवर रबीचे नियोजन करा

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर यांचे निर्देश : कृषी अधिकाºयांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात यावर्षी पावसाने दडी मारल्याने खरीपामधील पिकांना धोका निर्माण झाला आहे. मात्र उपलब्ध जलसाठे आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कृषी, सिंचन व अन्य विभागाने समन्वयाने रबी हंगामाचे नियोजन करावे, अशा सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली.
कृषी, सिंचन, पशुसंवर्धन विभागाचा आढावा घेण्यासाठी गुरूवारी चंद्रपूरच्या विश्रामगृहात बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती अर्चना जिवतोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अण्णासाहेब हसनाबादे, आत्माच्या प्रकल्प संचालक विद्या मानकर, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दीपक चव्हाण, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोनोने आदीसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी यावर्षी झालेल्या पर्जन्यमानाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यामध्ये भाताच्या पिकाचे नुकसान झाले असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. सोयाबिनचा पेरा कमी झाला असून कपासीचा पेरा वाढला आहे. तथापि, जिल्ह्यातील अनेक प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा अत्यल्प असल्यामुळे रब्बीचे नियोजन करताना प्रकल्पनिहाय नियोजन कृषी विभागाने करावे, असे आवाहन हंसराज अहीर यांनी केले.
आसोलामेंढा प्रकल्पामध्ये पुरेसे पाणी असून गरज पडल्यास गोसेखूर्द प्रकल्पातून पाणी मिळवता येईल, असे कार्यकारी अभियंता यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कृषी विभागाने आसोलामेंढा प्रकल्पाशेजारी १६ हजार हेक्टर जमिनीसाठी वेगळे नियोजन करावे. या ठिकाणी गहू आणि चना या रब्बी पिकाची लागवड करण्यासाठी कृषी व संबंधित विभागाने शेतकºयांशी संवाद साधावा, असे सांगितले. यावेळी बंदी घातलेल्या बियाण्यांची लागवड, कृषी मित्र, उन्नत शेती, बियाण्याची उपलब्धता, युरीयाची उपलब्धता या संदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. औषधी विक्री दुकानांमधून औषध विक्री करताना शेतकºयांना आवश्यक सल्ला आणि सुविधा पुरविल्या जात नसल्याबद्दल या बैठकीत चर्चा झाली. यावेळी सर्व विभागामार्फत शेतकºयांसाठी सुरु असणाºया योजनांवर यावेळी चर्चा केली. बैठकीला नरेंद्र जिवतोडे, शेखर चौधरी, चंद्रकांत गुप्ते, विजय वानखेडे, डॉ.भगवान गायकवाड आदींची उपस्थिती होती.
फवारणीसाठी काळजी घ्या
नव्या पध्दतीच्या बियाण्यांमुळे कपासी व अन्य पिकांची उंची वाढली आहे. त्यामुळे फवारणी करताना शेतकºयांनी सुरक्षा उपाययोजनांचा अवलंब करावा. चेहरा व शरीरावर विषारी कीटकनाशकांचा प्रभाव होणार नाही, याची काळजी घ्यावी. विषारी औषध अंगावर सांडल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते तसेच फवारणी यंत्र वापरताना शरीरापासून दूर राहील याची काळजी घ्यावी. तसेच वाºयाचा प्रवाह बघून फवारणी करण्याची दिशा ठरवावी, असे आवाहन बैठकीद्वारे करण्यात आले.

Web Title: Rabi planning on rain and possible conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.