थंडीवर रबीची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 11:51 PM2017-11-13T23:51:20+5:302017-11-13T23:51:39+5:30

शासन नेहमीच शेतकºयांना वाºयावर सोडत आला आहे. आता निसर्गही शेतकºयांवरच कोपू लागल्याचे दिसते.

Rabi sukide | थंडीवर रबीची मदार

थंडीवर रबीची मदार

Next
ठळक मुद्देसिंचनाअभावी लागवड क्षेत्रात घट : ऋतुचक्राचे असंतुलन कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासन नेहमीच शेतकºयांना वाºयावर सोडत आला आहे. आता निसर्गही शेतकºयांवरच कोपू लागल्याचे दिसते. यंदा पावसाअभावी खरिपात शेतकºयांना अतोनात नुकसान सोसावे लागले. नैराश्यात असलेल्या आता रबीचा आधार आहे. मात्र ग्रामीण स्रोतात पाणी नसल्याने सिंचनाचा अभाव आहे. शिवाय गतवर्षी हिवाळ्यातील थंडी किती दिवसात गायब झाली, हा अनुभव पाठिशी आहेच. त्यामुळे अनेकजण रबीचा हंगाम करावा की नाही, या विवंचनेत आहे. एकूणच थंडी चांगली पडली तर रबीचा हंगाम शेतकºयांना दिलासादायक ठरेल. अन्यथा पुन्हा नुकसान अटळ आहे.
यावर्षी खरीप हंगामावर शेतकºयांच्या आशा होत्या. मात्र अत्यल्प पाऊस पडल्याने अनेकांना प्रारंभी पेरणी करता आली नाही. तर ज्यांनी पेरणी केली त्यांची पिके पाण्याअभावी करपून गेली. धान पट्ट्यात अनेकांना रोवणी करता आली नाही. ज्यांनी केली, त्यांची पिकेही शेवटच्या पाण्याअभावी करपली. त्यामुळे खरीप हंगामातीेल उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येईल, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.
खरीप हंगामात जवळजवळ सर्वच शेतकºयांना मोठे नुकसान सोसावे लागले. अनेकांचा उत्पादन खर्चही निघेल की नाही, याची शाश्वती नाही. बँका, सावकार व नातेवाईकांकडून घेतलेले कर्ज शेतकरी फेडू शकले नाही. कर्ज फेडले, तर वर्षभर खाणार काय, हा देखील प्रश्न गंभीर.
खरीपात बसलेला आघात अनेक शेतकरी सहन करू शकले नाही. त्यामुळे बहुतांश शेतकरी रबी हंगामात पेरणी करायची हिंमतच दाखवित नसल्याचे दिसून येत आहे. काहींनी आता रबी हंगामात पेरणी करून खरिपात झालेले नुकसान थोडेतरी भरून निघेल, या आशेपोटी रबी हंगाम करायची तयारी सुरू केली आहे. डोक्यावर कर्ज असतानाही आणखी दुसºयांकडून हातउसणे पैसे घेत रबीची मशागत सुरू केली. हरभरा, ज्वारी, गहू, मका, लाखोळी आदी पिके रबी हंगामात घेतली जातात.
कृषी विभागाचे दीड लाखांहून अधिक सरासरी रबी हंगामाचे नियोजन असते. मात्र मागील वर्षी पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यात केवळ ९० हजार हेक्टरवरच रबी पिकांची लागवड झाली होती. पुढे उत्पादनातही घट आली होती. यावर्षी कृषी विभागाने एक लाख २० हजार हेक्टरवर रबीचे नियोजन केले आहे. यंदा पावसाळ्यात ३५ ते ४० टक्केच पाऊस झाला असल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार याची आधीपासूनच भीती आहे. रबीत सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. शेतकºयांना पीक जगविताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. रबी हंगामात मोठ्या प्रमाणात गहू व हरभºयाची लागवड होती. या पिकांना पाणी अधिक हवे नसले तरी थंडी चांगली पाहिजे असते. पिकांच्या वाढीसाठी थंडीचे वातावरण आवश्यक असते. मागील वर्षी हिवाळ्याच्या चार महिन्यांतील बोटावर मोजण्याइतक्या दिवसातच थंडीचा जोर दिसला. थंडीची अशीच परिस्थिती यंदाही राहिली तर गहू, हरभरा पिकांची वाढ खुंटून रबीतही शेतकºयांचे मोठे नुकसान होणार आहे.
जमिनीत पाणी मुरलेच नाही
यंदा पाऊसच अत्यल्प पडल्याने जमिनीतही पाणी मुरले नाही. नदी, तलाव, बोड्यात पाणी नाही. जिल्ह्यातील मोठ्या सिंचन प्रकल्पांचीही स्थिती नाजुक आहे. त्यामुळे रबीत पिकांना पाणी कुठून द्यावे, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. कोरपना तालुक्यात पकडीगुड्डम व अंमलनाला धरणातून शेतकºयांना पाणी देण्यात येते. मात्र मागील वर्षी धरणातूनही कराराप्रमाणे पाणी देण्यात आले नसल्याचा शेतकºयांचा आरोप होता. यंदा तसे होऊ नये, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Rabi sukide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.