राधा म्हणते, न बघितलेले स्वप्न ‘लोकमत’मुळे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 11:23 PM2018-06-29T23:23:48+5:302018-06-29T23:24:13+5:30
जीवनात एकदा तरी विमानाने प्रवास करावा, अशी सर्वसामान्यांची इच्छा असते. मी मात्र कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मला विद्यार्थी दशेतच हवाई सफर करता येईल. मात्र ‘लोकमत’मुळे मला विमानाने प्रवास करण्याची संधी मिळाली. अवघ्या दीड तासात विमानाने दिल्लीला पोहोचले. दिल्लीत विमानतळ पाहून मी भारावले, असे मत हवाई सफर विजेती चिमूरची राधा अजय चौधरी हिने व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : जीवनात एकदा तरी विमानाने प्रवास करावा, अशी सर्वसामान्यांची इच्छा असते. मी मात्र कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मला विद्यार्थी दशेतच हवाई सफर करता येईल. मात्र ‘लोकमत’मुळे मला विमानाने प्रवास करण्याची संधी मिळाली. अवघ्या दीड तासात विमानाने दिल्लीला पोहोचले. दिल्लीत विमानतळ पाहून मी भारावले, असे मत हवाई सफर विजेती चिमूरची राधा अजय चौधरी हिने व्यक्त केले.
‘लोकमत’तर्फे आयोजित संस्कारांचे मोती स्पर्धेत राधाने सहभाग घेतला आणि ती जिल्ह्यातून विजेती ठरली. नागपूर-दिल्ली-नागपूर अशी हवाई सफर करून परत आल्यानंतर ‘लोकमत’शी तिने संवाद साधला. नागपूर विभागातील ‘संस्कारांचे मोती’ स्पर्धेतील सर्व विजेते मंगळवारला सकाळी ७ वाजता नागपूरहून दिल्लीसाठी विमान प्रवासाला निघाले.
सर्वांचाच पहिला विमान प्रवास असल्यामुळे मोठा उत्साह होता. दीड तासाच्या हवाई प्रवासानंतर दिल्ली विमानतळावर आम्ही पोहोचलो. त्यानंतर काही वेळातच गोवा व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची भेट झाली. येथे दोन्ही राज्यांतील विद्यार्थी एकत्र भेटले. त्यानंतर देशाची राजधानी दिल्ली भेटीच्या प्रवासाला सुरूवात झाली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी आदींनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन संवाद साधण्याची संधी मिळाली. इंडिया गेट, राष्ट्रपती भवनदेखील पाहिले. शालेय जीवनात कोणत्याही उपक्रमातून हवाई सफर घडविण्याची संधी उपलब्ध झाली नाही. तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला ‘लोकमत’ समुहाने ही संधी उपलब्ध करून दिली, असे सांगत उपराष्ट्रपती नायडू यांनी ‘लोकमत’च्या उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. ही सर्व अनुभूती आपल्याला स्वप्नवत वाटत होती, अशी प्रतिक्रिया राधाने व्यक्त केली. परतीच्या प्रवासाला सुरूवात झाल्यानंतर दीड तासात विमान नागपूरला पोहोचले. विमानातील व्यवस्था उत्तम होती. पण भीती वाटत होती, असेही राधा म्हणाली. लोकमत जिल्हा कार्यालयाच्या वतीने तालुका प्रतिनिधी राजाकुमार चुनारकर यांनी राधाच्या निवासस्थानी जावून पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
लोकमतच्या उपक्रमाने राधाचे कुटुंबीयही भारावले
उपराष्ट्रपतींनी मोलाचे मार्गदर्शन केले. जीवनात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. राजकारणात नसले तरी संसद भवनात बसण्याचा योग आला. मी ‘लोकमत’ची खूप आभारी आहे, अशी राधा म्हणाली. ‘लोकमत’च्या उपक्रमामुळे राधाला विमानात पहिल्यांदाच प्रवास करण्याची संधी मिळाली. ही घटना विसरता येत नाही, अशी भावना चौधरी कुटुंबीयांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.