शेवटच्या माणसाच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन तोच खरा विकास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 12:57 PM2024-08-17T12:57:27+5:302024-08-17T12:58:09+5:30

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : चिमूर क्रांतीभूमीत शहीद स्मृती दिन सोहळा

Radical change in the life of the last person is the real development | शेवटच्या माणसाच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन तोच खरा विकास

Radical change in the life of the last person is the real development

लोकमत न्यूज नेटवर्क 
चिमूर :
भारतीय स्वातंत्र्याची सुरुवात झालेली भूमी म्हणून चिमूरची ओळख आहे. चिमूर क्रांती लढ्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आलो. शहीदांना स्मरून शेवटच्या माणसाच्या जीवनात परिवर्तन होते तोच खरा विकास आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शुक्रवारी स्थानिक बीपीएड मैदानावरील शहीद स्मृती दिन सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. 


यावेळी प्रमुख राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार कीर्तीकमार भांगडिया. माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार मितेश भांगडिया, माजी आमदार अतुल देशकर, प्रकाश देवतळे, लक्ष्मण गमे, प्रकाश वाघ आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्मृतिचिन्ह प्रदान करताना आमदार कीर्तीकुमार भांगडिया, माजी आमदार मितेश भांगडिया. उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, आपल्याला जे मिळाले त्यामागे हुतात्म्यांचे बलिदान आहे. त्यामुळे शहिदांना कदापि विसरता कामा नये, असे आवाहनही त्यांनी केले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध विकासकामांचे ई भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. संचालन अजहर शेख यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.


युवा पिढीला कळावा शहीदांचा इतिहास
प्रास्ताविकात आमदार कीर्तीकुमार भांगडिया म्हणाले, युवा पिढीला शहीदांचा इतिहास माहित व्हावा, त्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले. चिमूरचे अनेक प्रश्न मी मांडत आहे उपमुख्यमंत्री फडणवीस हे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविले. चिमूर क्षेत्राला कोट्यवधींचा निधी मिळवून दिला.


नागफना स्मृतीचिन्ह देऊन सत्कार

  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रारंभी चिमूर येथील हुतात्मा स्मारकात शहीद विरांना मानवंदना अर्पण केली. त्यानंतर कार्यक्र- मस्थळी उपस्थिती दर्शविली.
  • कार्यक्रमाचे आयोजक आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या हस्ते ना. फडणवीस यांना शहीद स्मारकाचा नागफना स्मृतीचिन्ह भेट देऊन सत्कार केला.
  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्याने महिलांनी देखील ना. फडणवीस यांचा सत्कार केला.

Web Title: Radical change in the life of the last person is the real development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.