दारुविक्रेत्यांविरुद्ध धाडसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 05:00 AM2020-06-24T05:00:00+5:302020-06-24T05:00:56+5:30
चारचाकी वाहनातून एमआयडीसी पडोली दाताळामार्गे चंद्रपुरकडे दारुची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी महर्षी विद्यालय दाताळा वळणाजवळ नाकाबंदी करुन एमएच ३४ ए ०८०४ या वाहनाला थांबवून तपासणी करुन वाहनातून ९५ हजार रुपये किंमतीच्या ९५० नग देशी बॉटल व वाहन असा चार लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दाताळा येथे नाकाबंदी करुन चार लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमालासह आशिष वसंत दरबेसवार (३०) रा. महात्मा फुले चौक, तर दुसऱ्या कारवाईत सागर रामकिशोर कंजर (२६) जलनगर याला ताब्यात घेवून ३५ हजार रुपये तर तिसºया कारवाईत चार लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
चारचाकी वाहनातून एमआयडीसी पडोली दाताळामार्गे चंद्रपुरकडे दारुची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी महर्षी विद्यालय दाताळा वळणाजवळ नाकाबंदी करुन एमएच ३४ ए ०८०४ या वाहनाला थांबवून तपासणी करुन वाहनातून ९५ हजार रुपये किंमतीच्या ९५० नग देशी बॉटल व वाहन असा चार लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दुसºया कारवाईत जलनगर येथे छापा टाकून सागर रामकिशोर कंजर (२६) जलनगर याला ताब्यात घेवून प्लास्टिक ड्रममध्ये गुळ आंबा सडवा आणि इतर साहित्य असा एकूण ३५ हजार ४७० रूपयाचा माल जप्त केला. तर तिसºया कारवाईत एका चारचाकी टाटा इंडिका वाहनातून १६ बॉक्स देशी दारु व वाहनचा असा चार लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात संजय, राजेंद्र खनके नागरे, अमजद आदींनी केली.
घुग्घुसमध्ये दीड लाखांची दारु जप्त
घुग्घुस मार्गाने चंद्रपूरकडे जाणाऱ्या एम एच ३४ बीएफ २२८९ वाहनाला धानोरा टोलजवळ थांबवून झडती घेऊन दीड लाख रुपये किंमतीच्या पंधराशे बॉटल देशी दारू वाहनातून जप्त करण्यात आली. या कारवाईत वाहनासह दारु असा एकूण सहा लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मयुर सत्तार शेख (२४), दिनेश रविंद्र आगबतनवार (२४) रा. मूल असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर कारवाई ठाणेदार राहुल गांगुर्डे, स.पो.नि चहांदे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे आमटे, सचिम, विनोद, महेश, सुधिर, सचिन, शार्दुल, निलेश, रणधिर आदींनी केली.