राजुरा-आसिफाबाद रोडवरील रेल्वे गेट विद्यार्थी व नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
By admin | Published: January 7, 2016 01:35 AM2016-01-07T01:35:10+5:302016-01-07T01:35:10+5:30
दाद द्यायलाही मन असावे लागते. ते ब्रह्मपुरीकरांच्या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच या ब्रह्मपुरीकरांनी ब्रह्मपुरी येथे आयोजित ब्रह्मपुरी महोत्सवात झालेल्या ...
घनश्याम नवघडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिसर (ब्रह्मपुरी)
दाद द्यायलाही मन असावे लागते. ते ब्रह्मपुरीकरांच्या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच या ब्रह्मपुरीकरांनी ब्रह्मपुरी येथे आयोजित ब्रह्मपुरी महोत्सवात झालेल्या प्रत्येक उपक्रमाला दाद देऊन आयोजकांचा उत्साह वाढविला. तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे.
शनिवारी २ तारखेला या महोत्सवाचा आरंभ झाला. नगर स्वच्छता अभियानाने सुरूवात झालेल्या या महोत्सवात सायंकाळी निघालेल्या शोभायात्रेने खऱ्या अर्थाने रंग भरला वा शोभायात्रेला आणि नंतर उद्घाटकीय कार्यक्रमाला लोकांनी दिलेला प्रतिसाद पाहिला तर अख्खी ब्रह्मपुरी नगरी लोकनगरी झाल्याचे भासत होते.
या महोत्सवात अनेक उपक्रम समाविष्ट होते. कृषी व व्यापार प्रदर्शनी, आरोग्य तपासणी शिबिर, कृषी मेळावा, सरपंचांचा सत्कार, महिला मेळावा, होम मिनिस्टर स्पर्धा आदी विविध उपक्रमांचा यात समावेश आहे.
या सर्वच उपक्रमांना ब्रह्मपुरीकरांनी भरभरून दाद दिली. यात कोणतीही शंका नाही. पण शिर्डीचे साईबाबा आणि ‘तथागत’ या महानाट्यांना दिलेला प्रतिसाद न भुतो न भविष्यती असाच म्हणावा लागेल. प्रतिसाद कशाला म्हणतात, ते या दिवशी ब्रह्मपुरीकरांनी खऱ्या अर्थाने दाखवून दिले.
मंगळवारी झालेल्या समारोपीय कार्यक्रमाबद्दल असेच म्हणता येईल. या दिवशी सायंकाळी मिस ब्रह्मपुरी आणि मिसेस ब्रह्मपुरी या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद होताच. पण या कार्यक्रमानंतर होणाऱ्या समारोपीय कार्यक्रमास जी उपस्थिती होती, तीसुद्धा लक्षणीय होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिसरात मिस ब्रह्मपुरी आणि मिसेस ब्रह्मपुरी हा कार्यक्रम सुरू असताना हजारो प्रेक्षक या कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते. त्याच वेळी सदर प्रतिनिधीने ब्रह्मपुरी येथील डेपो रोड, वडसा रोड, आनंद टॉकीज रोड या रस्त्यांनी फेरफटका मारला असता लोकांचे जत्थेचे जत्थे कार्यक्रम स्थळाकडे जाताना दिसत होते.