रेल्वेचे प्रवासी वाढले; सिंकदराबाद, तेलंगणासाठी अधिक प्रवासी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:31 AM2021-09-12T04:31:58+5:302021-09-12T04:31:58+5:30

सिकंदराबाद, तेलंगणाकडे अधिक प्रवासी दिसून येत आहेत. मागील वर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर रेल्वेसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यानंतर विशेष ...

Railway commuters increased; Secunderabad, more passengers for Telangana! | रेल्वेचे प्रवासी वाढले; सिंकदराबाद, तेलंगणासाठी अधिक प्रवासी !

रेल्वेचे प्रवासी वाढले; सिंकदराबाद, तेलंगणासाठी अधिक प्रवासी !

Next

सिकंदराबाद, तेलंगणाकडे अधिक प्रवासी दिसून येत आहेत. मागील वर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर रेल्वेसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यानंतर विशेष रेल्वेसेवा सुरू करण्यात आली. सद्यस्थितीत जिल्ह्यातून केवळ एक्स्प्रेस व विशेष रेल्वे धावत आहेत. मात्र त्याचे तिकीट दर जास्त असल्याने प्रवासी संख्या अल्प आहे. मात्र आता गणेशोत्सव असल्याने प्रवाशांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. सिंकदराबाद, तेलंगणा आदी मार्गांवर अधिक प्रवासी प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स

सिकंदराबाद, तेलंगणाची तिकीट मिळेना

गणेशोत्सव असल्याने प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सिकंदराबाद, तेलंगणा, दरभंगा, हमसफर आदी ट्रेनमध्ये प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या ट्रेनसाठी सुरुवातीला आरक्षण करणे गरजेचे आहे. अन्यथा अनेकजण वेटिंगवर राहत असल्याचे दिसून येत आहे.

बल्लारपूर चंद्रपूर मार्गावरून मुंबई, पुणेसाठी सध्या एकही ट्रेन नाही. त्यामुळे प्रवाशांना सेवाग्राम-वर्धा किंवा नागपूर येथे जाऊन मुंबई, पुणेसाठी ट्रेन पकडावी लागत आहे.

बल्लारपूर-नागपूर या मार्गावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

बॉक्स

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

सिंकदराबाद

तेलंगणा

दरभंगा

हमसफर

जीटी

संघमित्रा

केरला

नवजीवन

ए. पी. एक्स्प्रेस

दक्षिण एक्स्प्रेस

बाॅक्स

मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन

कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. परंतु, तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी सर्तकता बाळगत ट्रेनमध्ये प्रवाशांना प्रवास करताना मास्क व सॅनिटायजर अनिवार्य केला आहे. विशेष म्हणजे एक्स्प्रेस तसेच स्पेशल ट्रेनमधील लोकल डब्बे बंद ठेवण्यात आले आहेत. केवळ आरक्षित केलेल्या प्रवाशांनाच प्रवास करू दिला जात आहे.

प्रवासीसुद्धा नियमांचे पालन करीत मास्क व सॅनिटायझर स्वत:जवळच बाळगून प्रवास करीत आहेत.

बाॅक्स

दक्षिण एक्स्प्रेसमध्ये गर्दी कमीच

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानासुद्धा दक्षिण एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची संख्या अध्यापही रोडवली दिसून येत आहे. अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात प्रवासी दक्षिण एक्स्प्रेस किंवा एपी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची संख्या कमी दिसून येत आहे.

Web Title: Railway commuters increased; Secunderabad, more passengers for Telangana!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.