जेष्ठ नागरिकांची दीड वर्षांपासून रेल्वे सवलत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:06 AM2021-07-13T04:06:50+5:302021-07-13T04:06:50+5:30
मंगल जीवने बल्लारपूर : मागील १७ महिन्यांपासून कोरोना संकटामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवासात गर्दी वाढू नये, यासाठी नियमित गाड्या बंद ...
मंगल जीवने
बल्लारपूर : मागील १७ महिन्यांपासून कोरोना संकटामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवासात गर्दी वाढू नये, यासाठी नियमित गाड्या बंद करून विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्यामुळे सर्वसामान्य प्रवाश्यांचे जीवन वेदनादायक झाले आहे. जेष्ठ नागरिक असो, कॅन्सर पीडित असो की हार्ट पेशंट, सध्या सुरू असलेल्या विशेष रेल्वेगाड्यांमधून सवलत मिळत नसल्यामुळे कोणीही वरिष्ठ नागरिक प्रवास करू शकत नाही. महिलांचा खास डब्बाही विशेष गाड्यात नाही. यामुळे ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
पहिल्या लॉकडाऊनपासून नियमित चालणाऱ्या रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाने बंद करून विशेष गाड्या सुरु केल्या. संध्या सुरु असलेल्या विशेष गाड्यांमध्ये प्रवाश्यांच्या कोणत्याही श्रेणीसाठी सूट देण्यात येत नाही. प्रवाश्यांना आरक्षण करूनच तिकीट घ्यावे लागते. वेळेवर तिकीट मिळणे बंद आहे. रेल्वे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस पसरण्यापासून नियंत्रित करण्यासाठी व कोविडच्या महामारीमुळे प्रवाश्यांची गर्दी कमी करण्यासाठी पहिल्या लॉकडाऊनपासून भारतीय रेल्वेच्या देशात शेकडो विशेष उत्सवाच्या गाड्या धावत आहेत. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शहरात हजारोंच्या संख्येने असलेल्या वरिष्ठ नागरिकांकडून रेल्वे प्रशासनावर अत्यंत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. हेच नाही तर सर्वसाधारण गरीब लोकांनाही जनरल कोचमध्ये आरक्षण करूनच प्रवास करावा लागत आहे. यामुळे सामान्य प्रवाश्यांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. पूर्ववत रेल्वे गाड्या सुरू करून रेल्वे सवलत सुरू करण्याची मागणी होत आहे.
बॉक्स
या सवलती आहेत बंद
-ऑफिसच्या कामासाठी जाणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना ड्युटी पास कोटा.
-रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी मिळणार नॉन ऑफिशियल प्रवासासाठी मिळणार कोटा.
- आर्मी, सीआरपीएफसारख्या कोणत्याही स्पेशल फोर्सच्या भारतीय डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये काम करणाऱ्यांना किंवा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही सवलत मिळत होती.
- पार्लियामेंट हाऊस कोटा
या कोट्याअंतर्गत केंद्र व राज्य सरकारचे मंत्री सुप्रीम कोर्ट आणि हायचे जज आणि आमदार यांना फायदा मिळत होता.
- ६० वर्षांच्या वर असलेले पुरुष व ५८ वर्षांच्या वर असलेल्या महिलांना रेल्वेची सवलत मिळत होती.
- विदेशातून येणाऱ्या नागरिकांना सवलत देण्यात येत असे.
- व्हीआयपी नेता किंवा युनियनचे पदाधिकारी व इतर काही विभागांना वेगवेगळ्या कोट्याअंतर्गत आरक्षण करण्याची मुभा होती. त्या माध्यमातून तिकीट कन्फर्म होत होते.
- ज्या महिला ४५ वर्षांच्या वर आहे व गर्भवती आहे, अशा महिलांनाही आरक्षणाचा फायदा मिळत होता.
कोट
बल्लारशाह स्थानकावरून २५ टक्के गरीब ज्येष्ठ नागरिक व इतर आजाराने ग्रस्त रेल्वे प्रवाश्यांना रेल्वे सवलतीचा फायदा मिळत होता. ही सवलत बंद झाल्यामुळे त्यांची फजिती झाली आहे.
- जयकरण सिंग बजगोती, सदस्य डीआरयूसीसी,मध्य रेल्वे.
120721\hendicap.jpg
आरक्षित कोच