रेल्वे सोईसुविधांचे प्रस्ताव मंजूर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 11:12 PM2019-01-08T23:12:20+5:302019-01-08T23:13:16+5:30
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राअंतर्गत रेल्वेशी निगडीत विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रलंबित प्रस्तावांना लवकरच मान्यता देण्यात येणार आहे, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी दिली. मध्य रेल्वे व दक्षिण पूर्व-मध्य रेल्वे विभागातील विकास कामांच्या नागपुरातील आढावा बैठकीत ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राअंतर्गत रेल्वेशी निगडीत विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रलंबित प्रस्तावांना लवकरच मान्यता देण्यात येणार आहे, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी दिली. मध्य रेल्वे व दक्षिण पूर्व-मध्य रेल्वे विभागातील विकास कामांच्या नागपुरातील आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीचे अध्यक्ष रमणीक चव्हाण, झोनल रेल्वे समितीचे सदस्य दामोदर मंत्री, एमआयडीसी असोशिएशनचे अध्यक्ष मधुसुदन रूंगठा, विजय राऊत, दक्षिण-मध्य रेल्वे समितीचे सदस्य राहुल सराफ उपस्थित होते. ना. अहीर यांनी बैठकीत महत्त्वपूर्ण रेल्वेविषयक अनेक महत्त्वपूर्ण मागण्या आणि प्रलंबित प्रश्नांबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन प्रलंबित प्रश्नांचा निपटारा करण्याच्या सुचना केल्या.
विभागीय रेल्वे अधिकाºयांनी मुकूटबन रेल्वेस्थानकात नंदीग्राम, ताडोबा एक्सप्रेसच्या थांब्याकरिता महाप्रबंधक, मध्य रेल्वे, मुंबई यांच्याद्वारे रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती दिली.
बल्लारपूर येथे २५ कोचेसकरिता पीटलाईनचा प्रस्ताव पाठविण्यात आला. याकरिता ११ कोटी २५ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर काम सन २०२० मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. चंद्र्रपूर ते चांदाफोर्ट रेल्वे लाईनला जोडण्याकरिता प्रस्तावित लाईनचे काम २०२१ पर्यंत मार्गी लागणार आहे. बल्लारशाह स्थानकावरून नंदिग्राम एक्सप्रेसला सहा डब्बे जोडण्याचा प्रस्ताव तयार आहे. आनंदवन एक्सप्रेस सप्ताहातून तीन दिवस चालविण्यासाठी अधिकाऱ्यांनी तयारी दर्शविली.
बाबुपेठ पुलाचे काम २०२० पर्यंत पूर्ण होणार
बाबुपेठ उड्डाणपुलाचे काम युध्दपातळीवर सुरू असून ते २०२० पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही रेल्वे अधिकाऱ्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना बैठकीप्रसंगी दिली. बगडखिडकी द्वार क्रमांक ४२ या परिसरात रेल्वे लाईनवर आरओबीला जागा होत नाही. त्यामुळे अंडरपासकरिता पाठविलेला प्रस्ताव मंजूर झाला. वणी-घुग्घूस रेल्वे उड्डणपुलाचा आराखडा मंजुरीसाठी मुंबई मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.