जिल्ह्यातील अनेक भागात गारपिटीसह पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 10:42 PM2019-02-15T22:42:07+5:302019-02-15T22:42:31+5:30

जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, चिमूर, जिवती, कोरपना, सिंदेवाही तालुक्यातील अनेक भागात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गारपीट, वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. चिमूर तालुक्यातील पाचगाव येथे दोन जण जखमी झाले तर एका घराचेही नुकसान झाले. या अकाली पावसाचा रबी पिकांना पुन्हा जोरदार फटका बसला.

Rain accompanied by hail in many areas of the district | जिल्ह्यातील अनेक भागात गारपिटीसह पाऊस

जिल्ह्यातील अनेक भागात गारपिटीसह पाऊस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, चिमूर, जिवती, कोरपना, सिंदेवाही तालुक्यातील अनेक भागात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गारपीट, वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. चिमूर तालुक्यातील पाचगाव येथे दोन जण जखमी झाले तर एका घराचेही नुकसान झाले. या अकाली पावसाचा रबी पिकांना पुन्हा जोरदार फटका बसला.
मागील दोन-तीन दिवसांपासून थंडी जाऊन जिल्ह्याचे तापमान बºयापैकी वाढले होते. दुपारी ऊन्ह झोंबू लागली होती. अशातच शुक्रवारी सकाळपासून तापमान वाढले होते. मात्र सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ब्रह्मपुरी, चिमूर, जिवती, कोरपना, सिंदेवाही तालुक्यातील अनेक भागात वादळी वाºयासह पाऊस बरसला. गारपीटही झाली. ब्रह्मपुरी शहरात बोरीएवढ्या गारा पडल्या. त्यानंतर चिमूर, नवरगाव, जिवती, गडचांदूर, गांगलवाडी, नागभीड तालुक्यातील पाहाणी आदी गावात जोरदार गारपीट झाली. शंकरपूरपासून जवळ असलेल्या साठगाव, जवरबोडी, चिचाळा, कोलारी खैरी, पाचगाव येथे मोठया प्रमाणात गारपीट झाली. कोलारी येथील उषा बालकृष्ण धांडे व चिचाळा येथील सुरज गुडधे हे गारपीटमध्ये सापडल्याने जखमी झाले. त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. पाचगाव येथील एका घराचेही नुकसान झाले.
जवराबोडी येथील १२ घरांचे, कोलारी येथील १७ घरांचे तर साठगाव येथील ११ घरांचे व चिंचाळा येथीलही काही घरांची अंशत: पडझड झाली. शंकरपूर येथील नेहरू शाळेचे किचन शेड व काही घरांचे छप्पर उडाले. नागभीड तालुक्यातील पाहाणी येथील एका कार्यक्रमाच सभामंडपही कोसळला. दरम्यान, सायंकाळी ७ वाजतानंतर चंद्रपूरसह जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच भागात पाऊस बरसला. मात्र गारपीट झाली नाही.

Web Title: Rain accompanied by hail in many areas of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.