पुष्य नक्षत्राच्या पावसाने ५० टक्केच रोवणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:27 AM2021-07-29T04:27:51+5:302021-07-29T04:27:51+5:30
बल्लारपूर तालुक्यात खरीप हंगामात भात पिकाचे सरासरी क्षेत्र २ हजार ८७७ हेक्टर आहे. यापैकी १ हजार ४१३.५० हेक्टरवर पळसगाव, ...
बल्लारपूर तालुक्यात खरीप हंगामात भात पिकाचे सरासरी क्षेत्र २ हजार ८७७ हेक्टर आहे. यापैकी १ हजार ४१३.५० हेक्टरवर पळसगाव, मानोरा, इटोली, किन्ही, आसेगाव, कवडजई, मोहाडी, आमडी, कोठारी, कळमना, कोर्टी, लावारी, दहेली, बामणीच्या शेतकऱ्यांनी भाताची रोवणी केली. यंदा भाताची रोवणी करण्यासाठी पट्टा पद्धतीचा काही ठिकाणीच वापर करण्यात आला, तर इतर ठिकाणी दरवर्षीप्रमाणे भाताची रोवणी केली.
कोट
रोवणी करणे म्हणजे शेतकरी वर्गाचा एक सणच आहे. रोवणी करताना धुरे-पारा मारणे, चिखलणी करणे अशी कामे करावी लागतात. अनेक भागांतील महिला आजही रांगेने रोवणीची लोकगीते म्हणत रोवणीला बहर चढवितात. आता मात्र रोवणी गीत गाणाऱ्या महिलांचे प्रमाण कमी आहे. वयस्क स्त्रिया आजही ही परंपरा जोपासत आहेत.
-श्रीकांत ठवरे, कृषी सहायक, पळसगाव
कोट
यंदा शेतकऱ्यांनी गळीत धान्य पीक घेण्याकडे पाठ फिरविली आहे. गळीत धान्याचे सरासरी क्षेत्र २ हजार २८ आहे; परंतु ६१७ हेक्टरवर गळीत धान्याची पेरणी केली आहे. भाजीपाला पीक घेण्यास शेतकरी सरसावले आहेत. यावेळेस ६७.८० हेक्टरवर भाजीपाला पीक घेतले आहे. सोयाबीन व तिळाचा पेरा कमी आहे, तूर लागवड ४३१.८० हेक्टरवर केली आहे.
-श्रीधर चव्हाण, तालुका कृषी अधिकारी, बल्लारपूर
280721\img-20210724-wa0067.jpg
गीताच्या तालावर धानाची रोवणी करताना महिला