पावसाच्या गीताने सखी चिंब

By admin | Published: July 28, 2016 01:33 AM2016-07-28T01:33:56+5:302016-07-28T01:33:56+5:30

बाहेर पाऊसधारा आणि श्री शांताराम पोटदुखे सभागृहात ओसंडून वाहणारा उत्साह. प्रत्येक पावसाच्या गाण्यावर एकच जल्लोष,

Raindrops with rainy song | पावसाच्या गीताने सखी चिंब

पावसाच्या गीताने सखी चिंब

Next

आया सावन झुमके: कलर्स प्रस्तुत सखी मंच रिमझीम गाणी- झलक सुहानी कार्यक्रम
चंद्रपूर : बाहेर पाऊसधारा आणि श्री शांताराम पोटदुखे सभागृहात ओसंडून वाहणारा उत्साह. प्रत्येक पावसाच्या गाण्यावर एकच जल्लोष, युवती, महिला, पुरुष सारेच चिंबचिंब. २३ जुलैचा अविस्मरणीय दिवस आणि रंगलेला गाण्याचा कार्यक़्रम. निमित्त होते कलर्स प्रस्तुत सखी मंचच्या वतीने आयोजित ‘रिमझीम गाणी- झलक सुहानी’ कार्यक्रमाचे चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालय शांताराम पोटदुखे सभागृहात हा कार्यक्रम सखींच्या भरगच्च गर्दीत बहरला. प्रसिद्ध गायक मो. रफी, किशोर कुमार, लता मंगेशकर आदींच्या आवाजातील गाणी नागपुरातील उत्कृष्ठ गायक कलावंतानी सादर केले.
प्रत्येक गाण्याला सखींची दिलखुलास दाद हे वैशिष्ट्य ठरले. कार्यक्रमाच्या उद्घाटन सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश इंगोले यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. या कार्यक़माचे संचालन नेहा जोशी यांनी केले.
कार्यक्रमाचा प्रारंभ अंकीता टकले यांच्या गणेशाच्या भक्तीगिताने झाला. त्यानंतर एकापेक्षा एक सुरेख गीत सादर करण्यात आले. प्रसिद्ध गायक आणि गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेले सुनिल वाघमारे यांनी आज मौसम बडा व अमीत गणवीर यांनी सैराट झालं जी हे गीत सादर करुन कार्यक्रमाला एका उंचीवर नेऊन ठेवले. अंकीता टकले यांनी सूर निरागस हो हे गीत सादर करुन प्रेक्षकांची वाहवा घेतली. सैराटच्या झींगाट या गाण्यावर सखींनी ताल धरला. सुप्रसिद्ध गायक सुनिल वाघमारे यांनी जिंदगीभर नही भुलेंगे वो बरसात की रात यासोबतच मोहम्मद रफींची अनेक पाऊस गीते सादर केली. संकल्पना हार्मोनी इव्हेंटसचे श्री. राजेश समर्थ यांची होती, तर गीतांना साथसंगत नंदू गोहणे, राजा राठोर आणि पंकज यादव यांनी दिली.

पुन्हा एकदा कलर्स चॅनेलवर ३० जुलै २०१६ पासून शनिवारी रात्री १० वाजता झलक दिखला जा हॉट है सुरु होणार आहे. यावेळचे मुख्य आकर्षण म्हणजे २००६ ची मिस युनिव्हर्स श्रीलंका आणि सुप्रसिद्ध मॉडल जॅकलीन फर्नाडिस सेलीब्रेटी जज आहे. याशिवाय सुप्रसिद्ध फिल्म निर्देशक करण जौहर, सुप्रसिद्ध कोरीओग्राफर गणेश हेगडे हे सुद्धा परिक्षकांच्या भूमिकेत धमाल करणार आहे. एकूण १२ सेलीब्रेटीचा झलक दिखलाचा हॉट है यामध्ये सहभागी होणार आहे. ज्यात सुर्वीन चावला, करिश्मा तन्ना, शक्ती अरोरा, अर्जुन बिजलानी, गौरव गेरा (चुटकी फेम), पुनम शहा, प्रियंका शहा (जुळ्या बहिणी), हरपाल सिंग सोखी (शेफ), हेली शाह, नोरा फतेही, सलमान युसूफ खान, सिद्धांत गुप्ता आणि शांतनु माहेश्वरी असे १० नामवंत प्रख्यात सेलीब्रेटी या शोचे आकर्षण आहे. पण जॅकलीन फर्नांडिसच्या सहभागाने या शो ला एक ग्लॅमरस आणि सिझनिंग स्वरूप आले आहे. जे या शोचे वैशिष्ट आहे.

‘झलक दिखला जा’ नृत्यस्पर्धा
कलर्स प्रस्तुत सखी मंच ‘रिमझिम गाणी झलक सुहानी’ या कार्यक्रमात कलर्स चॅनलवर सादर करण्यात येत असलेल्या ‘झलक दिखला जा हॉट है’ या डान्स शोवर आधारीत नृत्य स्पर्धेने कार्यक्रमात रंगत आणली. प्रथम दहा सखींनी आपल्या नृत्याचे सादरीकरण दिले. त्यातील पाच उत्कृष्ट नृत्यांगणांना निवडण्यात आल्या. या पाच नृत्यांगणांचा अंतिम सामना घेण्यात आला. तो खूप मनोरंजक ठरला. या पाच जणींना जॅकलीनच्या गाण्यावर जॅकलीनसारखे नृत्य करायचे होते, त्यात तीन सखींनी बाजी मारली. अनुक्रमे प्रथम निकीता शास्त्रकार, द्वितीय वैष्णवी दुधलकर, तृतीय जयश्री ढवंगळे या विजेत्या ठरल्या.

 

Web Title: Raindrops with rainy song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.