जिल्ह्यात पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:35 AM2019-06-21T00:35:38+5:302019-06-21T00:36:04+5:30
मागील काही दिवसांपासून चातकासारखी वाट बघूनही पाऊस हुलकावनी देत असतानाच गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. यामुळे काही प्रमाणात का होईना उकाळ्यापासून दिलासा मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून चातकासारखी वाट बघूनही पाऊस हुलकावनी देत असतानाच गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. यामुळे काही प्रमाणात का होईना उकाळ्यापासून दिलासा मिळाला. खरीप पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
गुरुवारी दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास काही तालुक्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. चंद्रपूर शहरातही सायंकाळच्या सुमारास पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे बालकांनी पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद घेतला. जिल्ह्यातील कोरपना, बल्लारपूर, राजुरा, नागभीड, सिंदेवाही, चिमूर, ब्रह्मपुरी तालुक्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान, मूल तालुक्यातील सुशीदाबगाव परिसरात तुलनेने अधिक पाऊस पडला. चंद्रपूरकडे जाणाºया मार्गावरील नाल्याला पूर आला. परिणामी, वाहतूक प्रभावित झाली. सुशी परिसरातील नागरिकांना दुसरा मार्ग नसल्याने नाल्यातून वाट काढावी लागली. पावसाचे आगमन झाल्याने दमदार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मागील वर्षी पावसाने दमदार हजेरी दिली. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीला वेग आला होता. यंदाचे चित्र निराशाजनक आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु पेरणीसाठी आजचा पाऊस पुरेसा नाही. सर्वच तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील शेकडो शेतकºयांनी धुळपेरणी केली. पाऊस नसल्याने बियाणे करपले. त्यामुळे जिल्ंह्यातील काही शेतकºयांना दूबार पेरणी करावी लागणार आहे.