कोरोनापासून बचावासाठी जनतेमध्ये जागृती करा -जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:29 AM2021-03-10T04:29:09+5:302021-03-10T04:29:09+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी या विषयावर प्रशासनातर्फे संवाद तथा बैठक येथे पार पडली. यावेळी ते ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी या विषयावर प्रशासनातर्फे संवाद तथा बैठक येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, वरोराचे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, संवर्ग विकास अधिकारी आरेवार, न.प. मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, ठाणेदार सुनीलसिंग पवार उपस्थित होते. या बैठकीला पोलीस विभाग, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, तालुकास्तरीय कोविड टीम अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींमध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपरिषद सदस्य, सरपंच उपस्थित होते. संचालन मंदा लांडे, प्रास्ताविक तहसीलदार महेश शितोळे तर आभार डॉक्टर संजय आसुटकर यांनी मानले.