शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 11:44 PM2018-12-20T23:44:54+5:302018-12-20T23:45:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : शेतकऱ्यांना सिंचन विषयक सुविधा उपलब्ध करत त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शेतकऱ्यांना सिंचन विषयक सुविधा उपलब्ध करत त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत चिचाळा व लगतच्या गावांमध्ये पाईपलाईनद्वारे सिंचनाची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यासाठी २३ कोटी रूपये निधी आपण उपलब्ध केला आहे. बल्लारपूर तालुक्यात दहा गावांना सिंचनाच्या दृष्टीने वरदान ठरणारी पळसगाव-आमडी उपसा जलसिंचन योजना, चिचडोह बॅरेज अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील २८ व गडचिरोली जिल्ह्यातील ४३ अशा एकूण ७१ गावांना पिण्याचे पाणी व ११ हजार ५१० हेक्टर सिंचन क्षेत्रास लाभ मिळणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
मूल तालुक्यातील चिचाळा येथे पाईपलाईनद्वारे सिंचनाची सुविधा उपलब्ध करण्याच्या कामाच्या भूमीपूजन सोहळयानिमित्त आयोजित जाहीर सभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा नेते प्रमोद कडू, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, पंचायत समिती सभापती पूजा डोहणे, उपसभापती चंदू मारगोनवार, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज अवताडे, मुख्य अभियंता स्वामी, अधिक्षक अभियंता वेमूलकोंडा, कार्यकारी अभियंता राजेश सोनोने आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, विविध विकासकामे, पायाभूत सुविधा आदींसह शेतकºयांना सिंचन विषयक सुविधा उपलब्ध करून देण्यावर आपण नेहमीच भर दिला आहे. चांदा ते बांदा विशेष कार्यक्रमांतर्गत मूल तालुक्यातील चिचाळा व नजिकच्या सहा गावांना शेतीसाठी सिंचन सुविधा पुरविण्याकरिता २३ कोटी ४७ लक्ष ५४ हजार रू. निधी मंजूर करण्यात आला असून सदर परिसरातील शेतकºयांना या माध्यमातुन मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. जून २०१९ पर्यंत योजना पूर्ण करण्याचे आदेश आपण दिले आहेत. अजयपूर येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
पाच हजार शेतकºयांसाठी सधन शेतकरी प्रकल्प
नलेश्वर मध्यम प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचे अस्तरीकरणाचे काम, भसबोरण लघु प्रकल्पाच्या विशेष दुरूस्तीचे काम, पिपरी दीक्षित लघु प्रकल्पाच्या विशेष दुरूस्तीचे काम, जानाळा लघु प्रकल्पाची विशेष दुरूस्ती, राजोली येथील माजी मालगुजारी तलावाची विशेष दुरूस्ती, मौलझरी लघु प्रकल्पाची विशेष दुरूस्ती, मूल येथील माजी मालगुजारी तलावाच्या कालाडोह पूरक कालव्याच्या विशेष दुरूस्तीचे काम, जामखुर्द उपसा सिंचन योजनेचे विशेष दुरूस्तीची कामे मंजूर करत या सर्व विशेष दुरूस्तीच्या कामांसाठी सुमारे २५ कोटी रूपयांचा निधी मंजूर करविला आहे. विशेष बाब या सदराखाली मूल आणि पोंभुर्णा या तालुक्यातील शेतकºयांसाठी सिंचन विहिरी आपण मंजूर करविल्या आहेत. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने पाच हजार शेतकºयांसाठी सधन शेतकरी प्रकल्प आपण प्रायोगिक तत्वावर राबवित आहोत.