राजाभाऊ खोब्रागडेंना आदरांजली
By Admin | Published: October 3, 2016 12:51 AM2016-10-03T00:51:40+5:302016-10-03T00:51:40+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव समितीच्या विद्यमाने बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या ९१ वा जयंती सोहळा बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे भवन येथे झाला.
चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव समितीच्या विद्यमाने बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या ९१ वा जयंती सोहळा बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे भवन येथे झाला. याप्रसंगी त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या ‘सामाजिक न्यायाची प्रासंगिकता या’, या विषयावर गडचिरोलीचे डॉ. नामदेव खोब्रागडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा मांडला. प्रा. नितीन रामटेके यांनी अध्यक्षीय भाषण केले. बँक आॅफ इंडियाचे नागपूर येथील माजी उपव्यवस्थापक मनोहर रंगारी यांनी व्यवसायाच्या संधीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मंचावर कोमल खोब्रागडे व सविता कांबळे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रतिक डोर्लीकर, संचालन ज्योती शिवणकर तर आभार शुभम सागोरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशालचंद्र अलोणे, राजू खोबरागडे, सत्यजित खोब्रागडे, अशोक निमगडे, महादेव कांबळे, हरिदास देवगडे, देवानंद टिपले, सुलभ खोब्रागडे, संदीप देव, नेहा मेश्राम, गीता रामटेके, इ. एस. मेश्राम, वामन सरदार, भाऊराव दुर्योधन, त्रिरत्न मुन, तेजरात भगत, वनिता सहारे आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)