पंचायत राजकारणाला राजीव गांधींनी दिशा दिली
By admin | Published: January 6, 2016 01:27 AM2016-01-06T01:27:32+5:302016-01-06T01:27:32+5:30
देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा राजीव गांधी यांनी हाती घेतली त्यावेळी त्यांनी ७३ वी घटना दुरुस्ती केली.
नरेश पुगलिया : सरपंच, उपसरपंचांचा सत्कार
बल्लारपूर : देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा राजीव गांधी यांनी हाती घेतली त्यावेळी त्यांनी ७३ वी घटना दुरुस्ती केली. त्यामुळे पंचायत राज व्यवस्थेला बळकटी आली. ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळाली. स्व. राजीव गांधी यांच्या दुरगामी निर्णयामुळे पंचायत राजकारणाला नवी दिशा मिळाली, असे प्रतिपादन माजी खासदार नरेश पुगलिया यांनी सोमवारी सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभात केले.
बल्लारपूर शहर व तालुका काँग्रेस कमेटी व विदर्भ किसान मजदुर काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ स्थानिक बालाजी सभागृह येथे पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बल्लारपूरच्या नगराध्यक्ष छाया मडावी, गजानन गावंडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष घनशाम मुलचंदानी, वसंत मांढरे, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, तारासिंग कलसी, व्यंकटेश एम. बालबरैय्या, देवेंद्र आर्य, अशोक नागापूरे, नासीर खान, अनेकश्वर मेश्राम, माजी सभापती अॅड. हरिश गेडाम, विनोद बुटले, गोविंदा पोडे, देवेंद्र बेले यांची उपस्थिती होती. यावेळी सरपंच व उपसरपंचासह सदस्यांचा शाल, श्रीफळ व काँग्रेसचा दुपट्टा प्रदान करून सत्कार करण्यात आला. संचालन देवेंद्र आर्य यांनी तर आभार व्यंकटेश एम.बाल बरैय्या यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)