राजीव रतन रूग्णालयात रूग्णांना मिळणार अत्याधुनिक आरोग्यसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 10:53 PM2019-01-01T22:53:40+5:302019-01-01T22:53:57+5:30
वणी वेकोलि क्षेत्राच्या राजीव रतन रूग्णालयाला केंद्रीय रूग्णालयाचा दर्जा देण्यात आला एप्रिल २०१९ पर्यत सर्व डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. केंद्रीय रूग्णालय दजार्चा शिलान्यासचे उद्घाटन करताना सोमवारी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : वणी वेकोलि क्षेत्राच्या राजीव रतन रूग्णालयाला केंद्रीय रूग्णालयाचा दर्जा देण्यात आला एप्रिल २०१९ पर्यत सर्व डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. केंद्रीय रूग्णालय दजार्चा शिलान्यासचे उद्घाटन करताना सोमवारी ते बोलत होते.
यावेळी आमदार संजीव रेड्डी बतकुलवार, जि प.अध्यक्ष देवराव भोंगळे, वेकोलिचे निदेशक डॉ. संजय कुमार, खुशाल खांडेकर, जि. प. समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, जि.प. सदस्य नितू चौधरी, राहुल सराफ, वणी क्षेत्राचे महाप्रबंधक आर. के. मिश्रा नवनियुक्त महाप्रबधक कावळे, उपविभागीय अधिकारी राऊत व अन्य मान्यवर उपस्थित होते.
राजीव रतन रूग्णालयाच्या बाजुलाच येत्या काही महिन्यात वेकोलिचे सुपर हास्पिटल बनविण्याचा मनोदय वेकोलिचे प्रबंधक मिश्रा यांनी जाहीर केला. यावेळी मुंगोली, निरगुडा प्रक्ल्पग्रस्ताना धनादेश वितरण करण्यात आले. केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर म्हणाले, प्रकल्ग्रस्तांना १० लाख रूपये मिळवून दिले. प्रकल्पग्रस्तांनी न्यायासाठी मागील १९ वर्षापासून संघर्ष सुरू ठेवला. कामगारांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, अशी कामगार संघटनेची मागणी होती. तीही आता पूर्ण होत आहे, असेही ना. अहीर यांनी नमूद केले. घुग्घुस येथे क्रीडांगणासाठी वेकोलिची जागा आहे. त्या जागेचा प्रश्न निकाली लावावा. वेकोलिच्या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी गावकरी करत आहेत, याकडेही लक्ष देण्याची सुचना ना. अहीर यांनी वेकोलि अधिकाऱ्यांना दिली.