वनविभागाच्या वृक्षदिंडीने राजोली दुमदुमली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 01:07 AM2017-10-08T01:07:37+5:302017-10-08T01:07:46+5:30

वनपरिक्षेत्र कार्यालय सावली व क्षेत्र सहायक कार्यालय राजोलीच्या वतीने विविध कार्यक्रम घेवून वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.

Rajoli Dumdumali by forest department tree | वनविभागाच्या वृक्षदिंडीने राजोली दुमदुमली

वनविभागाच्या वृक्षदिंडीने राजोली दुमदुमली

Next
ठळक मुद्देवन्यजीव सप्ताह : मिरवणुकीतून जनजागृती, नागरिकांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : वनपरिक्षेत्र कार्यालय सावली व क्षेत्र सहायक कार्यालय राजोलीच्या वतीने विविध कार्यक्रम घेवून वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. सप्ताहा दरम्यान सामूहिक दुचाकी रॅली व वन्यजीवांबाबत वृक्षदिंडी काढून राजोलीत जनजागृती करण्यात आली.
वृक्षदिंडी व जनजागृती कार्यक्रमाला कीर्तनकार धारणे महाराज, सावली वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी जी. व्ही. धांडे, राजोलीचे सरपंच आनंद पाटील ठिकरे, प्रतिष्ठित नागरिक सुरेश पाटील ठिकरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड, सहा.शिक्षक चलाख, गरमळे, क्षेत्र सहा.एस.बी. येडकेवाड, बि.डी. चिकाटे, आर.एम. तांबरे, बि.सी. धुर्वे, वनरक्षक एस.एम. नन्नावरे, बि.एस. भेंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर रॅली व वनसप्ताहाचे आयोजन करण्याचे आदेश मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर वनवृत्त चंद्रपूर, विभागीय वनाधिकारी चंद्रपूर व सहायक वनसंरक्षक (तेंदु) यांनी दिले होते. सदर सप्ताह दरम्यान राजोली येथे ताळ, मृदुंग, लाऊडस्पिकर, फलक, नारे व भजनातून जनजागृती करण्यात आली. तसेच परिक्षेत्रातील प्रत्येक गावात वन्यप्राणी व वनाबाबत माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन वनरक्षक एन. व्ही. निरंजने यांनी केले. तर उपस्थितांचे आभार वनरक्षक ए.एम. देवगडे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजोलीचे शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Rajoli Dumdumali by forest department tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.