राजुºयाचे रेल्वेगेट खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 11:11 PM2017-09-25T23:11:11+5:302017-09-25T23:11:30+5:30
राजुरा शहरातील रेल्वे गेट पाच हजार विद्यार्थ्यांना वेठीस धरणारा रेल्वे गेट ठरत असून खड्डयात गेट की गेटमध्ये खड्डे हे समजायला मार्ग नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : राजुरा शहरातील रेल्वे गेट पाच हजार विद्यार्थ्यांना वेठीस धरणारा रेल्वे गेट ठरत असून खड्डयात गेट की गेटमध्ये खड्डे हे समजायला मार्ग नाही. रेल्वेचे कंत्राटदार अत्यंत निकृष्ठ दर्जाचे काम करीत असल्याचे पुढे येत असून गेटजवळ दोन फुटाचे खड्डे पडलेले आहेत. या रेल्वे गेटची दयनीय अवस्था झालेली आहे.
राजुरा येथील शिवाजी कॉलेज जवळील रेल्वे गेटच्या पुढे शाळा, महाविद्यालय मोठ्या प्रमाणात असून सहा शाळा आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत शालेय विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. याच दरम्यान, १५ मिनिटांच्या वर रेल्वे गेट दररोज १५ वेळा तरी बंद होते. सामान्य नागरिकांना या गेटचा काहीच फायदा नसून सिमेंट कंपन्यांचे चोचले पुरविण्यासाठी हा गेट तयार करण्यात आला आहे. कोट्यवधीचे भाडे कमविणाºया या सिमेंट कंपन्यांनी एक पूल तयार करून द्यायला पाहिजे. यासाठी राजकीय नेत्यामध्ये दम पाहिजे. दररोज हजारो नागरिकांना त्रास होत असताना एकही आंदोलन होत नाही, ही मोठी शोकांतिका आहे.