बल्लारपुरात खतांच्या दरवाढीचा राकाँतर्फे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:29 AM2021-05-26T04:29:12+5:302021-05-26T04:29:12+5:30

बल्लारपूर : एकीकडे पेट्रोलच्या किमती शंभराच्या वर गेल्या असताना भाजप सरकारने खतांची दरवाढ करून शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. ...

Rak protested against fertilizer price hike in Ballarpur | बल्लारपुरात खतांच्या दरवाढीचा राकाँतर्फे निषेध

बल्लारपुरात खतांच्या दरवाढीचा राकाँतर्फे निषेध

Next

बल्लारपूर : एकीकडे पेट्रोलच्या किमती शंभराच्या वर गेल्या असताना भाजप सरकारने खतांची दरवाढ करून शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. ही दरवाढ कमी केली पाहिजे, अशी मागणी करीत बल्लारपूर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे दरवाढीचा निषेध नोंदविला. याबाबत तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले आहे.

डीएपीची किंमत जवळपास ७१५ रुपयांनी वाढली आहे. जो डीएपी ११८५ रुपयाला होता. तो आता १९०० रुपयाला मिळणार आहे. १०.२६.३६ चे पन्नास किलोची गाेणी ११७५ रुपयांचे होते. ते आता १७७५ रुपयांना मिळणार आहे. यासोबतच पोटॅशच्या ही किमती वाढविल्या आहे. निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, बल्लारपूर तालुका अध्यक्ष महादेव देवतळे, बल्लारपूर कार्यकारी अध्यक्ष राकेश सोमाणी, आरिफ शेख, भूरूभाई बक्ष, देव यादव, सुमित डोहने, नितीन सोयाम, अंकित निवलकर यांची उपस्थिती होती.

Web Title: Rak protested against fertilizer price hike in Ballarpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.