कृषी कायद्याविरोधात राकाँचे रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:26 AM2021-02-07T04:26:58+5:302021-02-07T04:26:58+5:30
केंद्र सरकारने शेतकरी हित लक्षात न घेता अन्यायकारक तीन कायदे तयार केले. या कायद्यांविरुद्ध शेतकरी आंदोलन करीत आहेत. मात्र ...
केंद्र सरकारने शेतकरी हित लक्षात न घेता अन्यायकारक तीन कायदे तयार केले. या कायद्यांविरुद्ध शेतकरी आंदोलन करीत आहेत. मात्र हे आंदोलन सरकारकडून दडपले जात आहे, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. तीनही कायदे रद्द करण्याची मागणी राकाँचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ॲड. मोरेश्वर टेमुर्डे, राकाँ विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर यांनी केला. आंदोलनात बंडू डाखरे, दिनेश मोहारे, तालुकाध्यक्ष विशाल पारखी, जयंत टेमुर्डे, हसन दोसानी, बंडू खारकर, चंद्रकांत कुंभारे, राजू वरघने, अविनाश ढेंगडे, प्रदीप बुराण, नगाजी निंबालकर, अशोक पोफडे, बंडू भोगाडे, अतुल वानखेडे, तुलसी अलाम, विजय धंदरे, देवीदास धोटे, विजय तेलंग, दिलीप महल्ले, मुजमील शेख, अरुण सहारे, सुधाकर उपरे, पांडुरंग वैद्य, छबिया देवगडे, रंजना पारशिवे, सुशीला तेलमोरे, दिलीप खैरे आदी सहभागी झाले होते.
बॉक्स छायाचित्र
इंधन दरवाढीविरुद्ध राकाँ महिलांची निदर्शने
चंद्रपूर : केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरुद्ध चंद्रपूर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात चूल मांडून गोवऱ्यावर प्रतीकात्मक स्वयंपाक व निदर्शने करून तीव्र विरोध केला.
केंद्र सरकार चुकीची धोरणे राबवून नागरिकांचे हाल करत आहे. सिलिंडरच्या किमती वाढण्याची गरज नसताना अन्याय सुरू आहे. त्यामुळे दरवाढ रद्द करण्याची मागणी
राकाँच्या चंद्रपूर शहर कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे यांनी केली. आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, युवक जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, युवक शहर अध्यक्ष प्रदीप रत्नपारखी, नितीन पिंपळशेंडे, किसान सेल जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल एजाज, माजी नगरसेवक विनोद लभाने, दीपक गोरडवार, अभिनव देशपांडे, धीरज बाक्सरे, विपील लभाने, प्रीती लभाने, सारिका रामटेके, रुखमा पिंपशेंडे, कुसुम काठवले, सविता मेश्राम, अंतकला नक्षीने, शीतल कुडकेलवार, अजिता मेश्राम, सोनाली रायपुरे, ऊर्मिला यादव, रुंदा पाटील, खेलण सहारे, शेवंता कोंडावार उपस्थित होते.
बॉक्स
कोरपनात कृषी कायद्याची होळी
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी जनविकास सेनेने आज कोरपना-जिवती मार्गावर कृषी कायद्यांची प्रतीकात्मक होळी केली. आंदोलनात जन विकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख, सचिन पिंपळशेंडे, भिकू मेश्राम, सुनील बुटले, अरविंद आत्राम, किशोर मडावी, भोजीपाटील कुळमेथे, सत्यपाल किनाके, रवी पंधरे, दिनेश झाडे, कमलेश मेश्राम, विष्णू कुंभरे, तुषार निखाडे, आकाश लोडे, गीतेश शेंडे, अक्षय येरगुडे, सचिन दडमल, वसंता कुंभरे, शंभू नैताम, गिरीधर तोडासे व कार्यकर्ते सहभागी झाले होते.