महिला अधिवक्त्यांना रक्षाबंधनाची अनोखी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:30 AM2021-08-22T04:30:55+5:302021-08-22T04:30:55+5:30

चंद्रपूर : रक्षाबंधनाचे औचित्य साधून मानवता ही सेवा अधिवक्ता संघाच्या वतीने महिला अधिवक्त्यांना रक्षाबंधनानिमित्त सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन व ...

Rakshabandhan's unique gift to women advocates | महिला अधिवक्त्यांना रक्षाबंधनाची अनोखी भेट

महिला अधिवक्त्यांना रक्षाबंधनाची अनोखी भेट

Next

चंद्रपूर : रक्षाबंधनाचे औचित्य साधून मानवता ही सेवा अधिवक्ता संघाच्या वतीने महिला अधिवक्त्यांना रक्षाबंधनानिमित्त सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन व सॅनिटरी नॅपकिन इंसेनिरेटर डिस्पेन्सर मशीनची अनोखी भेट देऊन रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

चंद्रपूर न्यायालयात महिला अधिवक्त्यांची वाढती संख्या लक्षात घेता तसेच न्यायालयात न्यायासाठी येणाऱ्या महिला वर्गाची संख्या लक्षात घेता महिला प्रसाधनगृहात वापरलेले सॅनिटरी नॅपकिनचे योग्य नियोजन व्हावे, गरज पडल्यास सॅनिटरी नॅपकिन सहज उपलब्ध व्हावे, यासाठी मानवता ही सेवा अधिवक्ता संघातर्फे तळमजल्यावर असलेल्या प्रसाधन गृह कक्षात सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन व सॅनिटरी नॅपकिन इंसेनिरेटर डिस्पेन्सर मशीन बसविण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल, सत्र न्यायाधीश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जे. अन्सारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमासाठी चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनचे सचिव ॲड. संदीप नागापुरे, ॲड. अभय पाचपोर, ॲड. इंदर पुगलिया, ॲड. आशिष मुंधडा, ॲड. भूषण वांढरे, ॲड. आशिष धर्मपुरीवार, ॲड. राजेश ठाकूर, ॲड. नितीन गाटकिने, ॲड. मनश्री आंबडे, ॲड. सुजाता दुबे, ॲड. संध्या मुसळे, ॲड. इतिका शाह, ॲड. वैशाली टोंगे, ॲड. नूरजहान पठाण, ॲड. सारिका ठेंबरे, ॲड. अमृता वाघ आदींनी प्रयत्न केले.

Web Title: Rakshabandhan's unique gift to women advocates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.