विद्युत सुरक्षिततेसाठी रॅली
By admin | Published: January 17, 2017 12:31 AM2017-01-17T00:31:09+5:302017-01-17T00:31:09+5:30
उद्योग, उर्जा व कामगार विभाग आणि महावितरण व विद्युत निरीक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विदयमाने ११ ते १७ जानेवारीपर्यंत चंद्रपूर परिमंडळात सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे.
चंद्रपूर : उद्योग, उर्जा व कामगार विभाग आणि महावितरण व विद्युत निरीक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विदयमाने ११ ते १७ जानेवारीपर्यंत चंद्रपूर परिमंडळात सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे. त्या निमित्त सोमवारी महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळ कार्यालयातून विद्युत सुरक्षेचा संदेश देण्यासाठी मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
या रॅलीस मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी महावितरणच्या सेवेमधून लवकरच निवृत्त होणार असणारे प्रधान तंत्रज्ञ आनंदराव मांदाळे व किसन बोंडे यांना रॅलीला हिरवी झेंडी दाखविण्याचा मान दिला. यावेळी मुख्य अभियंता घुगल यांनीस्वत: दुचाकी चालवित रॅलीत भाग घेतला.
ही रॅली महावितरणच्या बाबुपेठ कार्यालयातून निघून महाकाली मंदिर, गिरनार चौक, जटपुरा गेट, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौेक, वाहतूक निरीक्षक कार्यालय, उर्जानगर रोडमार्गे मातोश्री विद्यालय येथे पोहोचल्यावर समारोप करण्यात आला. मातोश्री विद्यालयाच्या लेझिमच्या तालावर शाळेचे पी.टी. शिक्षक राजू काळे यांच्या मार्गदर्शनात याप्रसंगी चंद्रपूर मंडळाचे अधीक्षक अभियंता हरीश गजबे, मातोश्री विदयालयाचे मुख्याध्यापक सूर्यकांत खनके, कार्यकारी अभियंता (प्रशासन व सुरक्षा अधिकारी) पी. टी. राठी, विद्युत निरीक्षक प्रदीप चामट, कार्यकारी अभिंयता अजय खोब्रागडे, कार्यकारी अभिंयता डब्ल्यू. जी. नगराळे, कार्यकारी अभिंयता गौतम शहा, कार्यकारी अभिंयता अविनाश कुरेकार, कंत्राटदार असोसिएशनचे प्रवीण डेकाटे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता घुगल यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षिततेची शपथ दिली. वीज बचतीचे प्रात्यक्षिक तसेच वीज सुरक्षिततेवर पथनाटयाचे सादरीकरण धारीवाल इंफ्रा.च्या चमूद्वारे करण्यात आले. (प्रतिनिधी)