आदिवासी वसतिगृहातर्फे रॅली
By admin | Published: October 25, 2015 12:53 AM2015-10-25T00:53:23+5:302015-10-25T00:53:23+5:30
आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्र. २ चंद्रपूरतर्फे क्रांतीवीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या शहीद दिनानिमित्त रॅली ...
चंद्रपूर : आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्र. २ चंद्रपूरतर्फे क्रांतीवीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या शहीद दिनानिमित्त रॅली व मोफत चहा वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रॅली आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह येथून ते वीर बाबुराव शेडमाके शहीदभूमी इथपर्यंत काढण्यात आली होतीे. रॅलीचे उदघाटन वसतिगृहाचे गृहपाल वाकडे यांच्या हस्ते झाले. रॅलीमध्ये मुलांनी वीर बाबुराव शेडमाके व शहीद बिरसा मुंडा यांची वेशभूषा केलेली होती. रॅली शहिदभूमीला पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांतर्फे वीर बाबुराव शेडमाके यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करण्यात आले. तसेच वीर बाबुराव शेडमाके शहीदभूमीत आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्र. तर्फे मोफत चहा वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नामदेव पोलावाड, आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्र. २ चंद्रपूरमधील शंकर चौखे, प्रफुल्ल तोडासे, पुरुषोत्तम मसराम, मनोज तलांडे, उत्तम आडे, गुरुदास नन्नावरे, संजय बगडे व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.