निवडणुका आल्या की राम आठवतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 10:09 PM2019-01-13T22:09:50+5:302019-01-13T22:10:20+5:30

निवडणुका आल्या की भाजपाला राम आठवतो. रामाच्या नावावर खोटं बोलण्याचा धडाका भाजपा नेत्यांनी लावला आहे. जे रामाचे होऊ शकले नाही, ते जनतेचे काय होणार, असे प्रतिपादन विधीमंडळ उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.

Ram remembers when elections are over | निवडणुका आल्या की राम आठवतो

निवडणुका आल्या की राम आठवतो

Next
ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : जनसंघर्ष यात्रेला जनतेचा प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर/ ब्रह्मपुरी: निवडणुका आल्या की भाजपाला राम आठवतो. रामाच्या नावावर खोटं बोलण्याचा धडाका भाजपा नेत्यांनी लावला आहे. जे रामाचे होऊ शकले नाही, ते जनतेचे काय होणार, असे प्रतिपादन विधीमंडळ उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्टÑात चार महिन्यांपासून महाराष्ट्राच्या हक्कासाठी व जनतेच्या हितासाठी निघालेली संघर्ष यात्रा शनिवारी रात्री ९ वाजता चंद्रपुरातील कोहीनूर क्रीडांगणात दाखल झाली. त्यानंतर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी आ. वडेट्टीवार बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता ना. राधाकृष्ण विखे पाटील, आ. विजय वडेट्टीवार, आमदार आशिष देशमुख, विदर्भ निरीक्षक आशिष दुवा, अतुल लोंढे, जिल्हा प्रभारी किशोर गजभिये, शकुन नागानी, विशाल मुत्तेमवार, स्वयंजोक रामकिशोर ओझा, अनुसूचित जातीचे प्रदेश अध्यक्ष राजु वाघमारे, सेवक वाघाये, शहर अध्यक्ष नंदू नागरकर, जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे, सुभाषसिंह गौर, श्याम उमाळकर, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, विनायक बांगडे, घनश्याम मुलचंदानी, माजी आमदार देवराव भांडेकर, प्रकाश पाटील मारकवार, चित्रा डांगे, सुर्यकांत खनके, हरिष कोत्तावार, अ‍ॅड. मलक शाकीर, फारूख सिद्धीकी, विनोद संकट, शालिनी भगत, डॉ. रजनी हजारे, नंदा अल्लूरवार, वंदना भगत, अश्विनी खोब्रागडे, सुनिता अग्रवाल, शिवा राव, अनिल शिंदे, मंचावर उपस्थित होते. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील, अतुल लोंढ यांचीही भाषणे झाली.
दरम्यान, रविवारी ही यात्रा ब्रह्मपुरी येथे पोहचली. याठिकाणीही जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना आ. विजय वडेट्टीवार म्हणाले, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांना अपमानजनक वागणूक व उल्लेख केल्याबद्दल विद्यार्थ्यामध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे. अश्या शिक्षणमंत्रांनी जवाबदारीचे वक्तव्य करणे गरजेचे होते. त्यांना सत्तेचा माज आला आहे, असेही आ. वडेट्टीवार म्हणाले.
तत्पूर्वी ब्रह्मपुरी शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Ram remembers when elections are over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.