इरई नदीवरील रामसेतू प्रेम व सर्वधर्मसमभावाचा सेतू - सुधीर मुनगंटीवार

By राजेश मडावी | Published: July 6, 2023 04:37 PM2023-07-06T16:37:59+5:302023-07-06T16:40:07+5:30

केबलस्टे पुलावरील विद्युत रोषणाईचे लोकार्पण

Ram Setu Bridge of on Irai River is a bridge of Love and Equality says Sudhir Mungantiwar | इरई नदीवरील रामसेतू प्रेम व सर्वधर्मसमभावाचा सेतू - सुधीर मुनगंटीवार

इरई नदीवरील रामसेतू प्रेम व सर्वधर्मसमभावाचा सेतू - सुधीर मुनगंटीवार

googlenewsNext

चंद्रपूर : दाताळा मार्गावरील इरई नदीवरील रामसेतू केबलस्टे पुलावर विद्युत रोषणाईच्या लोकार्पणाचा सोहळा
बुधवार (दि.५ जुलै) संध्याकाळी उत्साहात पार पडला. राज्याचे सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा रामसेतू प्रेमाचा आणि सर्वधर्मसमभावाचा सेतू असल्याची भावना लोकार्पणाप्रसंगी व्यक्त केली. 

यावेळी भागवताचार्य मनीष महाराज, इंदरसिंग, मौलाना अतिकुर रहमान, भन्ते सुमन वंदू, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, माजी महापौर राखी कंचर्लावार, माजी उपमहापौर राहुल पावडे, नामदेव डाहुले, प्रकाश धारणे, सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रविंद्र गुरनुले, सा. बां. विभाग (विद्युत) चे अधिक्षक अभियंता हेमंत पाटील,  बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता टांगले, कार्यकारी अभियंता (विद्युत) पुनम पाटील, उपकार्यकारी अभियंता (विद्युत) भुषण येरगुडे उपस्थित होते. पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, हे केवळ रोषणाईचे लोकार्पण नव्हे तर नागरिकांत एकमेकांप्रती प्रेमाचा सेतू मजबूत करण्याचा सोहळा आहे. मुंबई, गोवा, दिल्ली येथील रोषणाई बघून आपल्याही शहरातील रामसेतुला झळाळी प्राप्त करून देता येईल, असा विचार मनात आला. त्यादृष्टीने येथील पदाधिकारी, नागरीक व अधिकारी यांच्या समन्वयातून या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. दाताळा रोडवरील इरई नदीवर हा रामसेतु बांधण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला. चंद्रपूर मनपाने रामसेतू नावाचा ठराव एकमताने पारित केल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.

‘रिव्हर फ्रंट’ची योजना

रामसेतुच्या बाजुला बंधारा बांधण्याचे नियोजन आहे. त्यात बोटींगचा आनंद घेता येईल. पुढील वर्षापासून गणेश विसर्जनासाठी येथे ‘रिव्हर फ्रंट’ तयार होणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना गणेशाच्या विसर्जन तसेच आरती करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

रोषणाईची वैशिष्ट्ये

रामसेतुवर दर्शनीय विद्युत रोषणाई झाली. यात प्रत्येक केबलला दोन लाईट्स लावण्यात आले. त्यामुळे संपूर्ण केबल प्रकाशमय होतो. सेतूवर असे ६४ केबल रोप असून एकूण १२८ लाईट्सची व्यवस्था झाली  पुलाच्या मध्य भागी एच फ्रेमला चारही बाजुंनी प्रकाशमय केले आहे. पुलाच्या सुरूवातीला एलईडी स्क्रीन आहे. यात रामसेतुचे वर्णन, विविध झाँकी व  शासकीय योजनांचे प्रक्षेपण करण्याची व्यवस्था आहे. विशेष दिन किंवा सणांच्या निमित्ताने ही प्रकाशयोजना रंगांनुसार बदलता येते, अशी व्यवस्था करण्यात आली.

Web Title: Ram Setu Bridge of on Irai River is a bridge of Love and Equality says Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.