रामाळा सौंदर्यहीन, आझाद झुडपांचा ‘गुलाम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 11:39 PM2017-11-02T23:39:17+5:302017-11-02T23:39:28+5:30

चंद्रपुरातील सर्वात मोठ्या रामाळा गार्डनकडे स्थानिक प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे या गार्डनने आपले सौंदर्यच घालवले आहे. एकेकाळी या गार्डनमध्ये शहरातील मंडळी सहकुटुंब जाऊन निवांतपणे आपला वेळ घालवत होती.

Ramala is a beauty, Azad shrubs 'slave' | रामाळा सौंदर्यहीन, आझाद झुडपांचा ‘गुलाम’

रामाळा सौंदर्यहीन, आझाद झुडपांचा ‘गुलाम’

googlenewsNext
ठळक मुद्देखुर्च्या तुटलेल्या, फरशा निघालेल्या, झुडपे वाढली, प्रवेशद्वाराचा मार्ग खडतर

राजेश भोजेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपुरातील सर्वात मोठ्या रामाळा गार्डनकडे स्थानिक प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे या गार्डनने आपले सौंदर्यच घालवले आहे. एकेकाळी या गार्डनमध्ये शहरातील मंडळी सहकुटुंब जाऊन निवांतपणे आपला वेळ घालवत होती. आता या गार्डनमध्ये पाय ठेवण्याचीही इच्छा होत नाही, इतकी दैना या गार्डनची झालेली आहे. आझाद बगिच्यातील काही साहित्य टिकून असले तरी या बगिच्याकडेही दुर्लक्ष झाल्यामुळे अनावश्यक झाडांनी बागेलाच गिळंकृत केले आहे.

चंद्रपूर शहराच्या मध्यभागी गोंड राजाच्या काळातील तलाव आहे. त्याला रामाळा तलाव असे संबोधले जातात. या तलावामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे या तलावातील जलसाठ्यामुळे परिसरात भुजलसाठा टिकून राहतो. या तलावाच्या बळावर अनेकांच्या घरी असलेल्या हातपंपांना वर्षभर पाणी येते. या तलावाच्या सौंदर्यात भर पडावी. तसेच शहरातील नागरिकांना अपुºया पडत असलेल्या आझाद बगिच्याव्यतिरित विरंगुळा म्हणून एक चांगला बगिचा मिळावा या हेतूने कासवाच्या आकाराच्या बगिच्याची निर्मिती या रामाळा तलावात करण्यात आली. हे गार्डन जनतेसाठी खुले झाल्यानंतर या ठिकाणी लहानमुलांना घेऊन चंद्रपूरकर मोठ्या संख्येने येथे आपला वेळ घालवत होते. सुटीच्या दिवशी तर येथे जत्रेचे स्वरुप यायचे. ‘नव्याचे नऊदिवस’ या प्रमाणे या गार्डनची अवस्था झालेली आहे. या गार्डनच्या देखभालीकडे प्रशासनाने कानाडोळा केल्यामुळे हे गार्डन आता सौंदर्य घालवून बसले आहे. गार्डनमध्ये असलेले मुलांच्या खेळण्याचे साहित्य मोडक्या अवस्थेत दिसत आहे. बसण्याच्या खुर्च्याही तुटलेल्या आहेत. झुडपे वाढलेली आहे. कारंजासाठी केलेल्या तलावातील पाण्याला दुर्गंधी सुटलेली आहे. अंतर्गत रस्त्यांवरील फरशा उखडलेल्या आहेत. प्रवेशद्वारापासून जाणारा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. इतकेच नव्हे, तर रामाळा तलावातील पाण्याचीही दुर्गंधी चंद्रपूरकरांना येथे येताना त्रासदायक ठरत आहे.
सुरक्षेची ऐशीतैसी
रामाळा गार्डनमध्ये दिवसभर अनेक मुले-मुली येतात. या मुला-मुलींवर टपोरींची तिरकस नजर असते. मात्र सुरक्षेची कसलीही हमी येथे मिळत नाही. या परिसरात स्टंटबाजीही बघायला मिळते. त्यावर कुणाचेही नियंत्रण राहात नाही. नुकतेचे दोन युवकांना अशाच स्टंटबाजीला बळी पडावे लागले.
आंबटशौकिनांसाठी सुरक्षित ठिकाण
आता हे गार्डन केवळ आंबटशौकिन प्रेमीयुगलांसाठी सुरक्षेचे ठिकाण बनले आहे. सकाळपासून दिवसभर येथे मजनुंचा वावर असतो. तेथे तयार झालेल्या झुडपांमध्ये चुकीने पाय पडला, तर कुणाच्याही अंगावर पडू शकतो. या व्यतिरिक्त या गार्डनमध्ये कुणीही दिसत नाही. अशी बिकट अवस्था या गार्डनची झालेली आहेत.
आझाद गार्डनची मिनी ट्रेन बंदच
आझाद बागेत लहानमुलांना खेळण्यासाठी अनेक साहित्य होते. बागेत लहानमुलांसाठी मिनी ट्रेनसुद्धा धावत होती. हे सगळे विरंगुळ्याचे साहित्य आझाद बगिच्यासह रामाळा गार्डनमध्ये नावालाच उरले आहे. स्थानिक प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे आता केवळ सकाळी फिरण्यासाठी तेवढा आझाद बगिच्याचा वापर उरला आहे.

Web Title: Ramala is a beauty, Azad shrubs 'slave'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.