पीओपी मूर्र्तींच्या रंगांमुळे रामाळाचे पाणी प्रदूषित
By admin | Published: September 26, 2016 01:12 AM2016-09-26T01:12:26+5:302016-09-26T01:12:26+5:30
गणेशोत्सव संपल्यानंतर ‘श्री’च्या मूर्तींचे शहरातील रामाळा तलाव व इतरत्र विसर्जन करण्यात आले.
चंद्रपूर : गणेशोत्सव संपल्यानंतर ‘श्री’च्या मूर्तींचे शहरातील रामाळा तलाव व इतरत्र विसर्जन करण्यात आले. त्यामुळे वाल्मिकी मच्छुआ सहकारी संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनी रामाळा तलावात निर्माल्य काढण्याचे काम सुरू केले आहे. त्यातून पीओपी मूर्ती व इतर मूर्र्ती बाहेर काढण्यात आल्या. चार-पाच दिवस झाले तरी पाण्यातील मूर्त्या मूळ स्वरूपात आहेत. त्या विरघळल्या नाहीत. त्या मूर्तींच्या रंगामुळे रामाळा तलावाचे पाणी प्रदूषित झाले.
मच्छुआ संस्थेचे सभापती जगन पचारे, संतोष झा, लक्ष्मण तोकला, पांडुरंग गावतुरे, देवराव पिंपळकर, किसन पचारे, देवराव मंचर्लावार, लक्ष्मण ठाकरे, आनंदराव कस्तुरे, रामकिशन पचारे, रवी मंचर्लावार, राजू मंचर्लावार, दीपक पचारे, राहुल बक्कलवार, राहुल मंचर्लावार, रवी काम्पेलवार, क्रीष्णा तोकलवार, अक्षय गुम्मेलवार व मंडळातील सदस्यांना गणपती मूर्ती बाहेर काढताना फार त्रास झाला. मूर्त्यांना लावलेला रंग पाण्यावर पसरून पाण्याचा रंग बदलत होता. तो रंग तलावाच्या प्रदूषणात भर टाकत होता. त्यामुळे तलावातील मासे मरण पावले. दरवर्षीचे हे चित्र यावर्षीही दिसले. भोई बांधव जेव्हा पाण्यामध्ये उतरतात, तेव्हा मूर्त्यांच्या रंगामुळे त्यांच्या हाता-पायाला खाज सुटते. त्यांना बारिक पुरळ येणे, सर्दी-खोकला होत असतो. कधी-कधी तर चक्कर येत असतो. अशाही परिस्थितीत संस्थेचे सभासद आपली मजुरी सोडून तलावाचा ठेका आमचा आहे, त्याच्यावर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे. आज ना उद्या आम्हाला मच्छी पकडला येईल. त्यापासून दोन पैसे मिळेल, या आशेपोटी काम करीत असतात. पण प्रशासनाकडून १५ दिवसांत रामाळा तलाव स्वच्छ दिसला पाहिजे, असे बजावण्यात आले. तेव्हापासून गणपती विसर्जन झाल्यानंतर निर्माल्य काढण्यात येत आहे. त्याची मजुरी कधीही प्रशासनाकडून मिळालेली नाही. त्यामुळे कधी-कधी उपासमारीची पाळी येत असते.
पीओपी मूर्तींवर बंदी आणली तरी त्याचा फारसा लाभ झालेला नाही. या मूर्त्या खरोखर बाद करायच्या असतील कडक कारवाई करून वाल्मिकी मच्छुआ सहकारी संस्थेला दिलासा द्यावा, असे एका पत्रकान्वये पांडुरंग गावतुरे यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)