रामनगरमध्ये घोरपडीला पकडण्याचा डाव फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:19 AM2021-06-19T04:19:39+5:302021-06-19T04:19:39+5:30
चंद्रपूर : येथील रामनगर परिसरामध्ये घोरपड दिसताच काही नागरिकांनी पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, याचवेळी प्यार फाऊंडेशनच्या सदस्यांनी सतर्कता दाखवित ...
चंद्रपूर : येथील रामनगर परिसरामध्ये घोरपड दिसताच काही नागरिकांनी पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, याचवेळी प्यार फाऊंडेशनच्या सदस्यांनी सतर्कता दाखवित घोरपडला सुरक्षित पकडून वन विभागाच्या मदतीने लोहारा जंगलात सोडले.
रामनगर चौकातील एका परिसरामध्ये घोरपड दिसताच काही नागरिकांनी पकडण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर काहींनी दगडही मारले. याचवेळी येथील प्यार फाऊंडेशनचे सदस्य अर्पित ठाकूर रस्त्याने जात असताना त्यांना हा प्रकार दिसला. त्यांनी लगेच नागरिकांना बाजूला सारले तसेच सुरक्षित पकडून फाऊंडेशनमध्ये आणले. यावेळी आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर वन विभागाला माहिती देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक पाकर्डे यांनी यासंदर्भात एमईएल नाका येथे नोंद करून प्यार फाऊंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र रापेल्ली, अर्पित ठाकूर तसेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जंगलामध्ये सुरक्षित सोडत जीवनदान दिले.
बाॅक्स
संरक्षित प्रजाती
वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२अंतर्गत घोरपड संरक्षित प्रजातीमध्ये मोडतात. त्यामुळे शिकार करणे, पकडणे गुन्हा आहे. यामुळे शिक्षादेखील होते. शिकारीमुळे अन्नसाखळीवर परिणाम होतो.
बाॅक्स
...असा आहे गैरसमज
घोरपडीचे मांस खाल्ल्यामुळे मानवी सामर्थ्य वाढते. तसेच रक्त प्यायल्याने कामोत्तेजना वाढत असल्याचा गैरसमज आहे. त्यामुळे घोरपडीची शिकार केली जाते. मात्र, हा गैरसमज आहे.