रमजान ईदला वृक्षारोपणाची झालर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2017 01:40 AM2017-06-29T01:40:10+5:302017-06-29T01:40:10+5:30

मुस्लीम बांधवाचा रमजान ईद पवित्र सण. या सणाला आगळेवेगळे महत्त्व समाज बांधवात आहे.

Ramzan Eidl Tree Frost | रमजान ईदला वृक्षारोपणाची झालर

रमजान ईदला वृक्षारोपणाची झालर

Next

विसापुरातील मुस्लीम बांधवाचा उपक्रम : कब्रस्तान परिसरात वृक्ष लागवड
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : मुस्लीम बांधवाचा रमजान ईद पवित्र सण. या सणाला आगळेवेगळे महत्त्व समाज बांधवात आहे. याला जोड देण्यासाठी व सामाजिक कार्याला चालना देण्यासाठी बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील मुस्लीम बांधवांनी कब्रस्तान परिसरात खुल्या जागेवर शेकडोवर वृक्षाची लागवड केली. सामाजिक बांधिलकीतून रमजान ईद सणाचे औचित्य वृक्षारोपणाची हिरवी झालर पसरविल्यामुळे या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चार कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्याचे योजिले आहे. यासाठी धरतीमाता हिरवीगार करण्याचा संकल्प केला आहे. वाढते प्रदूषण व पर्यावरणाचा ढासळलेला समतोल कायम ठेवण्यासाठी शासनस्तरावर आटोकाट प्रयत्न चालविला आहे. यासाठी लोकसहभागी महत्त्वाचा घटक आहे. या उपक्रमात आपलाही हातभार लागावा, म्हणून विसापूर येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईदचे औचित्य साधून कब्रस्तान परिसरात वृक्ष लागवड करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला आहे.
धर्माधर्मात वृक्षाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येकाने पर्यावरणाच्या रक्षणार्थ स्वत:ला झोकून दिले पाहिजे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी प्रयत्नशील राहिला पाहिजे. समाजाप्रती आपण काय करतो, आपली भावना काय, हा संदेश देण्यासाठी व वृक्ष लागवड करून त्याची जोपासना करण्यासाठी विसापूर येथील नुरानी कब्रस्तान कमिटीचे अध्यक्ष हाजी पारीद शेख यांच्या मार्गदर्शनात कब्रस्तान परिसरात शेकडोवर वृक्षाची लागवड करण्यात आली. यासाठी बल्लारपूरचे तहसीलदार विकास अहीर, बल्लारपूर वनपरिक्षेत्राधिकारी दिलीप वडेट्टीवार, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी, वनरक्षक धामनगे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. बदलत्या तापमानाला सामोरे जाताना वृक्ष लागवड करून त्याचे जतन करणे महत्त्वाचे आहे. याचाच भाग म्हणून राज्यात १ ते ७ जुलैदरम्यान वन महोत्सवांतर्गत चार कोटी वृक्ष लगवडीचा कार्यक्रम शासनस्तरावरुन जाहीर केला आहे. या उपक्रमातून त्या योजनेला हातभार लागला आहे.

Web Title: Ramzan Eidl Tree Frost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.