चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरचा रणजित युपीएससी परीक्षा उतीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 02:18 PM2019-04-06T14:18:32+5:302019-04-06T14:18:58+5:30

कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील रणजित हरीचंद्र थिपे यांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली असून देशात त्याचा ४८० वा क्रमांक आला आहे.

Ranjeet of Gadchandur in Chandrapur district passes UPSC examination | चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरचा रणजित युपीएससी परीक्षा उतीर्ण

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरचा रणजित युपीएससी परीक्षा उतीर्ण

googlenewsNext
ठळक मुद्देआईवडिल दोघेही शिक्षक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील रणजित हरीचंद्र थिपे यांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली असून देशात त्याचा ४८० वा क्रमांक आला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा ( युपीएससी) २०१८ च्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत तो उत्तीर्ण झाला असून त्याचा देशात ४८० वा क्रमांक आला आहे. रणजितचे प्राथमिक शिक्षण गडचांदूर येथील लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूल, माध्यमिक शिक्षण माणिकगड सिमेंट हायस्कूल तर पदवीचे शिक्षण के.आय.टी. कॉलेज कोल्हापूर येथे झाले आहे. गेल्या चार वर्षांपासून दिल्ली येथे तो या परीक्षेची तयारी करीत आहे. त्याचे वडील व आई दोघेही शिक्षक असून वडील हरिचंद्र थिपे जवाहर नेहरू विद्यालय, आवारपूर येथे तर आई ज्योती ही सावित्रीबाई फुले विद्यालय, गडचांदूर येथे कार्यरत आहे.

Web Title: Ranjeet of Gadchandur in Chandrapur district passes UPSC examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.