राफेल घोटाळ्याची जेपीसी चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:06 PM2018-12-24T23:06:04+5:302018-12-24T23:06:27+5:30
राफेल घोटाळ्याची जेपीसी चौकशी करावी, या मागणीसाठी जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले, अशी माहिती काँग्रेसचे विधान सभेतील उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राफेल घोटाळ्याची जेपीसी चौकशी करावी, या मागणीसाठी जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले, अशी माहिती काँग्रेसचे विधान सभेतील उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
मोदी सरकारने सुप्रिम कोर्टात खोटे बयाण सादर करून संसदेच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन केले आहे. अ.भा. काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या खोट्या बाबींचा भंडोफोड केला आहे. युपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बोलीनुसार १२६ राफेलमध्ये लढाऊ राफेल विमानाची प्रत्येकी किंमत ५२६.१० कोटी रुपये होती. म्हणजेच ३६ राफेलची किंमत १८ हजार ९४० कोटी रुपये होती. मोदी सरकारने ३६ लढाऊ राफेल विमान प्रत्येकी १६७०.७० कोटी म्हणजेच एकूण ६०,१४५ कोटी रुपयाने खरेदी केले. यामध्ये सरकारी खजिन्याची ४१ हजार २०१५ कोटींनी केलेली लुट आहे, असा गंभीर आरोेप आ. विजय वडेट्टीवार यांनी केला. हिंदूस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीला डावलून मोदी सरकार आपल्या धनाढ्य मित्रांना लाभ पोहचविण्यासाठी हे करीत असल्याचा आरोपही आ. वडेट्टीवार यांनी केला. ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर, मनोहर पाऊणकर, चित्रा डांगे, सुभाषसिंह गौर, सुनिता लोढीया, सुनिता अग्रवाल, विजय देवतळे, दिनेश चोखारे, सतीश वारजुकर, विनायक बांगडे, प्रकाशपाटील मारकवार, महेश मेंढे, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.