दूर्मिळ होत चाललेल्या गिधाडाचे दर्शन, सावली तालुक्यात दिसले 4 पक्षी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 10:55 PM2021-06-06T22:55:29+5:302021-06-06T22:56:07+5:30

वनविभाग अलर्ट : गिधाडाच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू

Rare vulture sightings, existence in shadow taluka in chandrapur | दूर्मिळ होत चाललेल्या गिधाडाचे दर्शन, सावली तालुक्यात दिसले 4 पक्षी

दूर्मिळ होत चाललेल्या गिधाडाचे दर्शन, सावली तालुक्यात दिसले 4 पक्षी

Next
ठळक मुद्देसावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.बी.कामडी, बिट वनरक्षक एस.टी. चुधरी व दोन कर्मचारी जंगलात गस्त करीत असताना पाथरी उपक्षेत्रातील मेहा बिटातील एका ढोरफोडी नाल्याजवळ मृत बैलाचे मांस खाताना चार गिधाड पक्षी दिसून आले

चंद्रपूर : निसर्गाचा सफाई कामगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिधाडाचे सध्या अस्तित्व हरपत चालले आहे. हा पक्षी आता दूर्मिळ होत चालला आहे. अशातच काही वनकर्मचाऱ्यांना रविवारी गस्त करीत असताना एका मृत जनावराजवळ चार गिधाड पक्षी दिसून आले. यामुळे पक्षीमित्रांमध्ये आनंद व्यक्त होत असून वनविभागही या पक्ष्याच्या संवर्धनासाठी अलर्ट झाला आहे.

सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.बी.कामडी, बिट वनरक्षक एस.टी. चुधरी व दोन कर्मचारी जंगलात गस्त करीत असताना पाथरी उपक्षेत्रातील मेहा बिटातील एका ढोरफोडी नाल्याजवळ मृत बैलाचे मांस खाताना चार गिधाड पक्षी दिसून आले. त्याच परिसरात मोठमोठे आंब्याचे झाड व एक पिंपळाचे झाडही आहे. येथेच या पक्ष्यांचा रहिवास असावा, असा अंदाज आहे. दूर्मिळ होत चाललेल्या गिधाडाचे अस्तित्व आढळून येताच वनविभागाने तत्काळ त्याच परिसरात या पक्ष्यांसाठी खाद्य उपलब्ध करण्याची सोय केली.तसेच बिटातील वनरक्षकांना बॉयना कुलर देऊन त्या पक्ष्यांचे निरीक्षण व संरक्षण करण्याचे निर्देश दिले. त्या परिसरात पुन्हा गिधाड पक्षी आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.
 

Web Title: Rare vulture sightings, existence in shadow taluka in chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.