रतनमुनीजी महाराजांचे चंद्रपुरात आगमन

By admin | Published: July 9, 2014 11:22 PM2014-07-09T23:22:01+5:302014-07-09T23:22:01+5:30

प. पुज्य वाणीभूषण पंडीतरत्न महाश्रमण रतनमुनीजी, डॉ. सतीशमुनीजी, शुक्लमुनीजी, रमनमुनीजी, आदित्यमुनीजी यांचे २०१४ च्या चातुर्मासाकरिता छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथून साकोली-ब्रह्मपुरी

Ratan Muniji Maharaj arrived at Chandrapur | रतनमुनीजी महाराजांचे चंद्रपुरात आगमन

रतनमुनीजी महाराजांचे चंद्रपुरात आगमन

Next

चंद्रपूर : प. पुज्य वाणीभूषण पंडीतरत्न महाश्रमण रतनमुनीजी, डॉ. सतीशमुनीजी, शुक्लमुनीजी, रमनमुनीजी, आदित्यमुनीजी यांचे २०१४ च्या चातुर्मासाकरिता छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथून साकोली-ब्रह्मपुरी मार्गे दररोज २५ ते ३० किमी पायदळ चालून बुधवारी चंद्रपुरात प्रवेश केला. त्यांचे आगमन होताच भाविकांनी जल्लोषात स्वागत केले.
रतनमुनी महाराजांचा दीपककुमार तुषारकुमार डगली यांच्या निवासस्थानावरुन जैन भवन येथे प्रवेश झाला. यावेळी सकल जैन समाजातील महिला व पुरुषांनी जयघोष केला. यावेळी रायपूर, दुर्ग, भिलाई, मुंबई, वरोरा, वणी, देवरा, सिरसा, हिंगोली, गडचिरोली, बिजा येथून मोठ्या संख्येने भाविक आले. जनसमुदायाला गुरु महाराजांनीे प्रवचन केले. यावेळी गुरु महाराजांनी धर्म, तप, आराधना करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले. मानवता हाच खरा धर्म असून हा प्रत्येक व्यक्तीकडून मानवता धर्माची जोपासना व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करताना रतनमुनीजी यांनी व्यक्त केली. यापूर्वीच्या काळात मनुष्याला संत आणि सत्संगाचा सहवास लाभत असल्याने आदर्श समाज आणि व्यक्तीमत्व विकास साधण्यासाठी व्यसनमुक्त राहून धार्मिक व सामाजिक कार्यात वेळ देत असल्याने मनुष्याचे जीवन सर्वांग सुंदर होते, अलिकडे मात्र वैज्ञानिक प्रगतीमुळे मनुष्य स्वभावातही अमुलाग्र बदल होत असून मानवाला मानवता धर्माचा विसर पडू लागल्याची खंत रतनमुनी महाराज यांनी व्यक्त केली.
मनुष्य जीवन हे क्षणभंगूर असल्याने मनुष्याने जीवनाचा अर्थ समजून इच्छा विरहीत जीवन जगून सत्कार्य करावे, असा सल्ला त्यांनी दिला. जो माणूस अहंकारी, मन, मत व जाती भेद करून मानवता धर्माला विसरू लागला आहे. त्या माणसाचा पुर्नजन्म होत नसतो, असे सांगताना माणसाने अहंकारी न राहण्याचा सल्ला दिला. बलशाली भारताच्या निर्मितीसाठी आदर्श व्यक्ती आणि समाजाची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त करताना रतनमुनी महाराज यांनी संस्कार आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी निस्पृह, निस्वार्थी आणि निष्कलंक मनुष्याची गरज असून परमार्थासाठी संसाराचा त्याग करणारे संत मंडळी हे कार्य करीत असल्याचे गुरुमहाराजांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान, भोपालसिंगजी खडोड यांच्याकडून भोजन ठेवण्यात आले होते. यावेळी योगेश भंडारी, निर्दोष पुगलिया, सुभाष जैन, राज पुगलिया, रविंद्र बैद, दीपक डगली, पंकज बोथरा, नरेश तालेरा, जितेंद्र चोरडिया, तुषार डगली, दीपक पारख, पदम लोढा, किशोर गांधी, दिलीप बोहरा, प्रशांत बैद, अमित बैद, संदीप बाढीया, फेनबाबू भंडारी, सुहास साकले, सुधीर बाढीया, अशोक बोथरा, राहूल पुगलिया आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Ratan Muniji Maharaj arrived at Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.