तीन लाखांवर कुटुंबांना मिळणार गणपतीनिमित्त आनंदाचा शिधा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 12:31 PM2024-07-27T12:31:49+5:302024-07-27T12:37:19+5:30

Chandrapur : १०० रुपयांत अंत्योदय व प्राधान्य रेशन कार्डधारकांना मिळणार लाभ

Ration 'Aanandacha Shidha' to 3 lakh families on the occasion of Ganapati | तीन लाखांवर कुटुंबांना मिळणार गणपतीनिमित्त आनंदाचा शिधा

Ration 'Aanandacha Shidha' to 3 lakh families on the occasion of Ganapati

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
सणासुदीच्या दिवसात राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय व प्राधान्यक्रम रेशन कार्डधारकांना १०० रुपयांत 'आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तीन लाखांवर कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. या किटमध्ये एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो सोयाबीन तेल, एक किलो चणाडाळ आदी साहित्य आहे. आता गणपती उत्सवादरम्यान लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वितरण केला जाणार आहे.


सामान्य गरीब नागरिक उपाशी राहू नयेत, यासाठी पुरवठा विभागाद्वारे रेशन दुकानाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरण केले जाते. याशिवाय सणासुदीच्या दिवसामध्ये राज्य शासनाच्या वतीने आनंदाचा शिधा वितरण केला जातो. केवळ शंभर रुपयांमध्ये रवा, साखर व चणाडाळ प्रत्येकी एक किलो आणि एक लिटर तेल दिले जाते. आता गणपती उत्सव साजरा करता यावा, याकरिता आनंदाचा शिधा अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.


१५ ऑगस्टपासून होणार वितरण
जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थी रेशन कार्डधारक संख्येनुसार जिल्हा पुरवठा विभागाद्वारा मागणी नोंदविण्यात येत आहे.
या किटचा गोदामात पुरवठा झाल्यानंतर १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान संबंधित रेशन कार्डधारकांना वितरित करण्यात येणार आहे.


गणपतीनिमित्त मिळणार आनंदाचा शिधा
सणासुदीच्या दिवसात महागाईची झळ गोरगरीब कुटुंबाना पोहोचू नये, यासाठी रेशन दुकानातून अंत्योदय व प्राधान्य गटातील रेशन कार्डधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. यावर्षी गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा मिळाला होता. आता गौरी, गणपतीच्या निमित्ताने सवलतीच्या दरामध्ये रवा, साखर, चणाडाळ व सोयाबीन तेल दिले जाणार आहे.


काय काय मिळणार?
गौरी गणपती सणानिमित्त अंत्योदय व प्राधान्य गटातील रेशन कार्डधारकांना १०० रुपयात मिळणाऱ्या या आनंदाच्या शिधामध्ये एक किलो रखा, एक किलो साखर, तेल, एक किलो चणाडाळ आदी वस्तू मिळणार आहेत.


या लाभार्थ्यांना मिळणार लाभ
गौरी गणपतीनिमित्त १०० रुपयांमध्ये आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. यामध्ये अंत्योदय तसेच प्राधान्य गटातील कार्डधारकांना हा लाभ मिळणार आहे. १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान आनंदाचा शिधा वितरीत केला जाणार आहे.
 

Web Title: Ration 'Aanandacha Shidha' to 3 lakh families on the occasion of Ganapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.