राशन कार्डधारकांचा सभापतींना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:16 AM2018-08-31T00:16:39+5:302018-08-31T00:17:39+5:30
राशन कार्ड असून कार्डधारकांना राशन घेण्यास अडचण जात आहे. त्यामुळे या अडचणी सोडविण्यासाठी तालुक्यातील राशन कार्डधारकांनी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांचा कार्यालयाला भेट देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राशन कार्ड असून कार्डधारकांना राशन घेण्यास अडचण जात आहे. त्यामुळे या अडचणी सोडविण्यासाठी तालुक्यातील राशन कार्डधारकांनी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांचा कार्यालयाला भेट देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली.
तालुक्यातील स्थायी ठिकाणी स्वस्त धान्य दुकानाचा अभाव असल्याने तालुक्यातील कार्डधारकांना चार ते पाच किमी अंतरावर जाऊन राशन खरेदी करावे लागते. अनेक ठिकाणी वाहनाची सुविधा नसल्याने नागरिक पायदळ प्रवास करीत जातात. अनेकदा दुकान बंद असल्याने नागरिकांना गेल्यापावली परत जावे लागते. त्यामुळे त्याचा बराच वेळ वाया जातो. त्यामुळे प्रत्येक गावात स्वस्त धान्य दुकान द्यावे, गावातील महिला बचत गट, सहाय्यक संस्था यांच्या मार्फत गावात स्वस्त धान्य दुकान चालविण्यात यावे, अशा विविध समस्या कार्डधारकांनी सभापतीपुढे मांडल्या. दरम्यान समाजकल्याण सभापती पाझारे यांनी नागरिकांसोबत जि.प. अन्नपुरवठा अधिकारी यांचा कार्यालयात जाऊन राशन घेण्याकरिता येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा करुन अडचण दूर करण्याचे निर्देश दिले. यावेळी तालुक्यातील राशन कार्डधारकांची उपस्थिती होती.