शिधापत्रिकाधारकांना मिळणार मोफत धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:28 AM2021-05-13T04:28:51+5:302021-05-13T04:28:51+5:30

चंद्रपूर : बल्लारपूर तालुका शिधापत्रिका क्षेत्रात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत मे २०२१ करिता कौटुंबिक शिधापत्रिकेवर देय असलेल्या नियंत्रित शिधाजिन्नसांचे ...

Ration card holders will get free foodgrains | शिधापत्रिकाधारकांना मिळणार मोफत धान्य

शिधापत्रिकाधारकांना मिळणार मोफत धान्य

Next

चंद्रपूर : बल्लारपूर तालुका शिधापत्रिका क्षेत्रात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत मे २०२१ करिता कौटुंबिक शिधापत्रिकेवर देय असलेल्या नियंत्रित शिधाजिन्नसांचे परिमाण व दर निश्चित करण्यात आले असून, राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नियमित गहू व तांदूळ मोफत मिळणार आहे. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थींना गहू व तांदूळ मोफत मिळणार आहे.

बाॅक्स

दर तसेच परिमाण :

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी

शिधापत्रिकाधारकांना गहू प्रतिव्यक्ती ३ किलो, तर तांदूळ प्रतिव्यक्ती २ किलो यानुसार मोफत देय राहील.

अंत्योदय अन्न योजनेंतर्गत गहू प्रतिशिधापत्रिका १५ किलो व तांदूळ प्रतिशिधापत्रिका २० किलो यानुसार मोफत देय राहील, तर साखर २० रुपये प्रतिकिलो दराने, प्रतिशिधापत्रिकेस १ किलो देय राहील.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना गहू व तांदूळ मोफत असून, गहू प्रतिव्यक्ती ३ किलो, तर तांदूळ प्रतिव्यक्ती २ किलो याप्रमाणे देय राहील.

अंत्योदय अन्न योजनेंतर्गत गहू व तांदूळ मोफत असून, गहू प्रतिव्यक्ती ३ किलो तर तांदूळ प्रतिव्यक्ती २ किलो देय राहणार असल्याचे बल्लारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार यांनी कळिवले आहे.

Web Title: Ration card holders will get free foodgrains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.