रेशन धान्य देत नाही, दुकानदारच बदलून टाकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:18 AM2021-07-09T04:18:41+5:302021-07-09T04:18:41+5:30

जिल्ह्यात ४ लाख ५७ हजारावर एकूण रेशनकार्ड धारकांची संख्या आहे. मात्र अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबालाच शासनाच्या विविध योजनेतून धान्य ...

Ration does not give grain, the shopkeeper changed it | रेशन धान्य देत नाही, दुकानदारच बदलून टाकला

रेशन धान्य देत नाही, दुकानदारच बदलून टाकला

Next

जिल्ह्यात ४ लाख ५७ हजारावर एकूण रेशनकार्ड धारकांची संख्या आहे. मात्र अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबालाच शासनाच्या विविध योजनेतून धान्य दिल्या जाते. विशेष म्हणजे, अनेकवेळा दुकानदार तसेच कार्डधारकांमध्ये धान्य देण्यावरून तसेच इतरही कारणामुळे खडके उडतात. अशावेळी कार्डधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. काही वेळा कार्डधारक घर बदलवितात. त्यामुळे ते रेशनपासून वंचित राहण्याची भीती असते. त्यामुळे शासनाने रेशन दुकान पोर्टेबिलिटी योजना सुरू केली आहे.यानुसार ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार रेशन दुकान बदलविणे सहज शक्य झाले आहे. जिल्ह्यात ६ हजार ३०४ नागरिकांनी आपल्या सोयीनुसार रेशन दुकान बदलवित या योजनेचा लाभ घेतला आहे.

बाॅक्स

एकूण रेशन कार्डधारक- ४,५७,३२९

बीपीएल-२,६१,०३१

अंत्योदय-१,३७,१४५

केशरी-५९,१५३

किती जणांनी दुकानदार बदलला-६३०४

बाॅक्स

कोणत्या तालुक्यात किती जणांनी बदलला दुकानदार

बल्लारपूर ७१६

भद्रावती ५३७

ब्रह्मपुरी ८५

चंद्रपूर ८१४

चंद्रपूर शहर १७८१

चिमूर ४६७

गोंडपिपरी १८

जिवती ७२

कोरपना ८९

मूल-८९

नागभीड १८३

पोंभूर्णा ३४

राजुरा २७०

सावली ३१

सिंदेवाही ४०

वरोरा १०७८

एकूण ६३०४

बाॅक्स

शहरात जास्त बदल

ग्रामीण भागाच्या तुलनेमध्ये शहरी भागामध्ये रेशन दुकान पोर्टेबिलिटीचा लाभ घेण्याची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर शहरात जून महिन्यामध्ये तब्बल १ हजार ७८१ कार्डधारकांनी दुकानदार बदलला आहे. त्यानंतर वरोरा तालुक्यात १ हजार ७८ जणांनी रेशन दुकान बदलविले आहे. काही दुकानदारांसोबत उडणाऱ्या खटक्यांमुळे तर काहींनी दुसरीकडे घर बदलविल्यामुळे रेशन दुकान पोर्टेबिलिटी केली आहे. गोंडपिपरी तालुक्यात केवळ १८,सावलीत ३१,पोंभूर्णामध्ये ३४ जणांनी पोर्टेबिलिटीचा लाभ घेतला आहे.

बाक्स

नोव्हेंबरपर्यंत मिळणार मोफत धान्य

कोरोना संकटामुळे यावर्षी अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्यक्रम तसेच अंत्योदयच्या कार्डधारकांना मोफत धान्य दिल्या जात आहे. त्यातच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गतही याच कार्डधारकांना मोफत धान्य दिल्या जात असून नोव्हेंबर महिन्यापर्यंत त्यांना धान्य मिळणार आहे.

Web Title: Ration does not give grain, the shopkeeper changed it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.