धान्यातील तुटीने रेशन दुकानदार व ग्राहक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 11:33 PM2018-03-04T23:33:04+5:302018-03-04T23:33:04+5:30
शासकीय गोदामातून स्वस्त धान्य दुकानदार धान्याची उचल करीत असतात उचल केलेल्या धान्यातील वजनात मोठी तुट येत असल्याने ही तुट कशी भरून काढावी, यावरुन स्वस्त धान्य दुकानदारासह रेशन उचलणारे ग्राहक त्रस्त झाले आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : शासकीय गोदामातून स्वस्त धान्य दुकानदार धान्याची उचल करीत असतात उचल केलेल्या धान्यातील वजनात मोठी तुट येत असल्याने ही तुट कशी भरून काढावी, यावरुन स्वस्त धान्य दुकानदारासह रेशन उचलणारे ग्राहक त्रस्त झाले आहे.
गरिबांना कमी दरात धान्य उपलब्ध व्हावे, याकरिता स्वस्त धान्य दुकानातून शिधा पत्रिकेवरुन नागरिक गहू, तांदुळ, साखर आदी गृहोपयोगी वस्तूंची दर महिन्याला उचल करीत असतात. स्वस्त धान्य दुकानदार शासनाकडून मिळणाऱ्या कमिशनवर ग्राहकांना धान्य देत असतात.
मागील काही महिन्यांपासून शासकीय गोदामातील ५० किलोच्या बॅगमध्ये एक ते दीड किलो धान्य स्वस्त धान्य दुकानदारांना कमी मिळत आहे. कधी ही तूट ५० किलो बॅगमध्ये दोन किलोपर्यंत जात असते. गहू व तांदळामध्ये अशा प्रकारची तूट मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे दिसून येत आहे.
काही स्वस्त धान्य दुकानदार शासकीय गोदामातून ३०० ते ४०० क्विंटल गहू व तांदळाची महिन्याकाठी उचल करीत असतात. या मोठ्या स्वस्त धान्य दुकानदारांना त्याचा अधिक फटका बसत आहे. स्वस्त धान्य दुकानात ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक वजनाने धान्य मोजून दिले जाते. त्यामुळे त्यांचे इलेक्ट्रॉनिक काट्यांना वजनाकडे लक्ष असते. वजन कमी दिल्यास ग्राहक ओरड करीत असतात. अशावेळी शासकीय गोदामातून उचल केलेल्या तूट असलेल्या धान्याचा भुर्दंड स्वस्त धान्य दुकानदारांना सहन करावा लागत आहे. ते नुकसान कोणीही भरून देत नाही.
शासनाकडून मिळणाºया कमिशनमध्ये स्वस्व धान्य दुकानदारांना दुकान त्यातील नोकरवर्ग इतरही खर्च करावा लागतो. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार मेटाकुटीस आल्याचे दिसून येत आहे. यासोबत एखाद्या वेळी धान्याचा दर्जा सुमार असल्यास ग्राहक ते घेत नाही. तोदेखील भुर्दंड स्वस्त धान्य दुकानदारास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.