बायो जैविक शेती शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 05:00 AM2020-10-24T05:00:00+5:302020-10-24T05:00:21+5:30

तालुक्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. धान लागवडीचा खर्च जाता शेतकऱ्यांच्या वाट्याला फारसे काही येत नाही. परिणामी, दरवर्षी आर्थिक संकटे पाचविला पुजलेली असतात. यावर पर्याय म्हणून हळदी येथील शेतकरी सुनील चलाख यानी जैविक शेती सुरू केली. रासायनिक शेतीला त्यांनी पूर्णत: फाटा दिला. त्यांचे कार्य अन्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले.

A ray of hope for bio-organic farmers | बायो जैविक शेती शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण

बायो जैविक शेती शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण

Next
ठळक मुद्देहळदी येथील प्रयोग यशस्वी : त्रिसुत्रीने दिला रासायनिकयुक्त शेतीला फाटा

राजू गेडाम । ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : रासायनिक खत व किटकनाशकांचे दुष्परिणाम हे भयंकर नुकसानकारक सिद्ध होत असताना हळदी येथील प्रयोगशील शेतकरी सुनिल चलाख यांनी सुरू केलेल्या बायो एफ जैविक शेतीचा यशस्वी प्रयोग आशेचे किरण ठरला आहे. सुपीक भुसभुसीत माती, खर्चात बचत आणि उत्पन्नात हमखास वाढ ही त्रिसूत्री जैविक शेतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
तालुक्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. धान लागवडीचा खर्च जाता शेतकऱ्यांच्या वाट्याला फारसे काही येत नाही. परिणामी, दरवर्षी आर्थिक संकटे पाचविला पुजलेली असतात. यावर पर्याय म्हणून हळदी येथील शेतकरी सुनील चलाख यानी जैविक शेती सुरू केली. रासायनिक शेतीला त्यांनी पूर्णत: फाटा दिला. त्यांचे कार्य अन्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले. त्यामुळे सत्यक्रांतीच्या जैविक शेती विकास अभियान अंतर्गत शेतातील आमराईत शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत प्रगतीशील शेतकरी चलाख यांचा सत्कार व जैविक शेती जागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला.
रासायनिक शेतीऐवजी जैविक शेतीचा अंगिकार सर्व शेतकऱ्यांनी विषमुक्त अन्न-आरोग्यसंपन्न परिवारासोबत सुपिक मातीची कास सर्वांनी धरावी. विषमुक्त असलेल्या पिकाची लागवड करावी जेणेकरून आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुव्यवस्थित राखण्यास मदत होईल, अशी माहिती सुनील चलाख यांनी दिली.

अशी आहे शेती
रासायनिक खत व कीटकनाशके वापरल्याने शेत जमीन खराब होते. त्यातील पोषक द्रव्ये नाहीसे होतात. हे टाळण्यासाठी हळदी येथील शेतकरी चलाख यानी आपल्या जनांवराच्या गोठ्यातील शेण, तणस, कचरा, काड्या आदी एकत्र करुन गावाशेजारी टाकले. त्या खताला उन्ह लागू नये, म्हणून सावलीसाठी ग्रीन जाळी बांधली. त्यानतर वेळोवेळी पाणी शिंपले. यातून गांडुळ तयार झाले. हे जैविक खत पिकाला उपयुक्त ठरले आहे.

Web Title: A ray of hope for bio-organic farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती