रोहयो मजुरांना ‘आधार’ची सक्ती

By admin | Published: April 10, 2015 12:51 AM2015-04-10T00:51:51+5:302015-04-10T00:51:51+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या मजुरांना १ एप्रिलपासून आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे.

Razio laborers are forced to 'base' | रोहयो मजुरांना ‘आधार’ची सक्ती

रोहयो मजुरांना ‘आधार’ची सक्ती

Next

चंद्रपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या मजुरांना १ एप्रिलपासून आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. रोहयोच्या कामावर राबणाऱ्या मजुरांची मजुरी यापुढे केवळ राष्ट्रीयकृत बँकेत जमा होणार असून जिल्हा मध्यवर्ती बँक तथा स्थानिक पोस्ट कार्यालयातील खाते यापुढे चालणार नाही, असा आदेश शासनाने काढला आहे. त्यामुळे मजुरांना आता नव्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत कुशल व अकुशल कामाचा समावेश होतो. या योजनेत १२० दिवस कामे उपलब्ध करुन देण्याचा नियम आहे. किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध करुन दिलेच पाहिजे, असा कायदा आहे. आदिवासी बहुल गावात १५० दिवस कामे दिली पाहिजे, असेही शासनाचे धोरण आहे.
मात्र १ एप्रिलपासून या मजुरांना आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले असल्याने आधार कार्ड नसेल तर मस्टर तयार होणार नाही, याची धास्ती मजुरांनी घेतली आहे.
केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेर्तंगत प्रत्येक नागरिकांचे आधार कार्ड काढण्याचे काम सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ८४ टक्के नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. मात्र, जे २६ टक्के नागरिक आधार कार्डपासून वंचित आहेत, ते नागरिक रोजगार हमी योजनेच्या कामावर असणारे बहुतेक मजुर आहेत. तर आधार कार्ड काढुनही अनेकांना पोस्टाद्वारे आधार कार्ड प्राप्त झालेले नाही. त्यामुळे रोहयोच्या कामावर आधार कार्ड विना जायचे कसे, हा पेच मजुरांसमोर निर्माण झाला आहे.
रोजगार हमी योजनेच्या कामाची मजूरी मजुरांच्या खात्यात जमा होते. हे खाते राष्ट्रीयकृत बँकेतच असणे गरजेचे आहे. मात्र अनेक गावात राष्ट्रीयकृत बँकेची शाखा नाही, तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा अनेक गावात सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे बँकेचे व्यवहार पार पडत आहेत.
मात्र रोजगार हमी योजनेच्या कामावर राबणाऱ्या मजुरांना मजुरीसाठी राष्ट्रीयकृत बँकेची अट घालण्यात आल्याने अनेकांना अडचण निर्माण झाली आहे. पोस्ट आॅफिसच्या शाखेतील खातेही आता यापुढे चालणार नाही, असा आदेश शासनाने काढला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Razio laborers are forced to 'base'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.