घोडे व्यावसायिकांचे पुन्हा नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:51 AM2021-03-13T04:51:14+5:302021-03-13T04:51:14+5:30
शहर व परिसरात यात्रा, उत्सव व लग्नसराईत नवरदेवाच्या वतातीत मिरवण्यासाठी लागणारा घोडा देणारे व्यावसायिक आहेत. मार्च, एप्रिल, मे ...
शहर व परिसरात यात्रा, उत्सव व लग्नसराईत नवरदेवाच्या वतातीत मिरवण्यासाठी लागणारा घोडा देणारे व्यावसायिक आहेत. मार्च, एप्रिल, मे व जून आदी चार महिने लग्नसराईचा हंगाम असतो. मात्र मागील वर्षी त्यांचा व्यवसाय गेला. दरम्यान, काही दिवसापूर्वी कोरोना रुग्ण संख्या घटल्यानंतर पुन्हा लग्नसमारंभ सुरु झाले. यामुळे काही प्रमाणात का होईने हास्य फुलले. मात्र आता पुन्हा रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे लग्नसमारंभावर प्रतिबंध आला आहे. लग्न उरकते घेतले जात आहेत. लग्न लागण्यापूर्वी नवरदेवाची मारोती मंदिरापासून ते लग्न मांडवापर्यंत मिरवणूक काढली जाते. काळानुरूप लग्न सोहळ्यात आधुनिकता आली असली तरी नवरदेवाची घोड्यावरुन मिरवणूक काढण्याची हौस कायम आहे. शाही घोड्यासाठी तासभर मिरवणुकीचे ५ ते १० हजार रुपयापर्यंत भाडे मोजावे लागते. परंतु सद्या कोरोनामुळे मिरवणुकीला बंधने आल्याने नवरदेवाच्या परण्या मिरवणे टाळले जात आहे. यामुळे लग्नसराईत घोड्यांचा व्यवसाय करणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.