वाचन संस्कृती जोपासली पाहिजे
By admin | Published: October 9, 2016 01:32 AM2016-10-09T01:32:44+5:302016-10-09T01:32:44+5:30
वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. मराठी युवकांनी एकत्र येऊनआर्थिक महासत्तेच्या लढाईत सहभागी झाले पाहिजे, ...
संजय धोटे : संभाजी बिग्रेड महाअधिवेशनाचा समारोप
राजुरा : वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. मराठी युवकांनी एकत्र येऊनआर्थिक महासत्तेच्या लढाईत सहभागी झाले पाहिजे, असे प्रतिपादन मराठा सेवा संघातर्फे आयोजित संभाजी ब्रिगेडच्या महाअधिवेशनात बोलताना राजुराचे आमदार संजय धोटे यांनी केले.
आ. धोटे पुढे म्हणाले की, विचारांच्या लढाया झाल्या पाहिजेत. मराठी युवकांनी एकत्र आले पाहिजे. युवक जो दिशाहीन होत चालला आहे, व्यसनाधीन होत आहे. या व्यसनाधीन युवकांना मार्ग दाखविण्याचे काम संभाजी ब्रिगेडने केले पाहिजे. व्यसनमुक्त समाजाची निर्मिती केली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभदादा खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडचे कार्य समाज हिताचे असल्याचे सांगितले. अधिवेशनात माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, माजी आमदार अॅड. एकनाथराव साळवे, स्वागताध्यक्ष अविनाश जाधव, विचारवंत गंगाधर बनबरे, विभागीय अध्यक्ष विनोद थेरे, उमाकांत धांडे, पंचायत समिती सदस्य नरेंद्र काकडे, सुभद्रा कोटनाके, जिल्हाध्यक्ष प्रवीण काकडे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक महाअधिवेशनाचे स्वागताध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी केले.
संचालन प्रणाली घुघूल यांनी केले. आभार चंद्रकांत भोयर यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)