चिमूर न्युज डीसीपीएस धारक कर्मचाऱ्यांच्या पावत्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:53 AM2020-12-17T04:53:02+5:302020-12-17T04:53:02+5:30
- शिक्षक भारतीचे शिक्षणाधिका-यांना निवेदन चिमूर : जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत जिवती व कोरपना या तालुक्यातील बऱ्यांच प्राथमिक ...
- शिक्षक भारतीचे शिक्षणाधिका-यांना निवेदन
चिमूर : जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत जिवती व कोरपना या तालुक्यातील बऱ्यांच प्राथमिक शिक्षकांचे डिसीपीएस खाते अजून उघडण्यात आलेले नाही. डिसीपीएस धारक शिक्षकांनी अनेकदा आपले प्रस्ताव पंचायत समितीला सादर केले असून यंत्रणेद्वारे त्यांची योग्य कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. डिसीपीएसधारक शिक्षकांची झालेली कपात व पावत्यावरील रकमेतील तफावत दूर करण्यासंबधाने डीसीपीएसचा घोळ दुर करण्यासंदर्भात शिक्षणाधिकारी दिपेंद्र लोखंडे यांना चंद्रपूर जिल्हा शिक्षक भारतीने बुधवारला निवेदन दिले आहे.
डिसीपीएस संदर्भात पंचायत समितीमध्ये चौकशी केली असता ते थातूरमातूर उत्तरे देतात. जिल्हा परिषदेत चौकशी केली तर ते प्रस्ताव जि.प.पर्यंत पोहचले नाही, असे लक्षात आले आहे. हे डीसीपीएसधारक कर्मचाऱ्यांच्या जीवनाशी खेळत आहेत. बऱ्याच शिक्षकांच्या डिसीपीएस खात्यातून त्यांची तालुक्यावरून रक्कम कपात केलेली आहे. परंतु ती अजूनपर्यंत जिल्ह्याला पोहचली नाही व ती पोस्टींग केली नाही, असे लेखा विभागात चौकशी केल्यावर शिक्षक भारतीला आढळून आले. डिसीपीएस धारक शिक्षकांची झालेली कपात व पावत्यांतील रक्कमेतील तफावत आहे. ती तफावत दूर करण्यासंबंधाने व डीसीपीएसचा घोळ दूर करण्यासंदर्भात जि. प. शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांना चंद्रपूर जिल्हा शिक्षक भारती तर्फे निवेदन देण्यात आले. शिक्षणाधिकारी यांनी यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असे संघटनेला आश्वासन दिले. निवेदन देताना शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश डांगे, कार्याध्यक्ष जब्बार शेख, सरचिटणीस नंदकिशोर शेरकी, माध्यमिकचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम टोंगे, कार्यवाह राकेश पायताडे, मूल तालुका अध्यक्ष क्रिष्णा बावणे, राजुरा तालुका अध्यक्ष संजय बोबाटे, चंद्रपूर तालुका अध्यक्ष रॉबीन करमरकर उपस्थित होते.