सिंदेवाही बसस्थानक समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 01:42 AM2017-12-14T01:42:01+5:302017-12-14T01:42:19+5:30

चंद्रपूर ते नागपूर मार्गावर स्थानिक शिवाजी चौकाजवळ नवीन बसस्थानक उभारण्यात आले. परंतु, मुलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे हे बसस्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे.

Recognition of Sindhivahi bus station | सिंदेवाही बसस्थानक समस्यांच्या विळख्यात

सिंदेवाही बसस्थानक समस्यांच्या विळख्यात

Next
ठळक मुद्दे१५ वर्षांपासून रंगरंगोटी नाही : प्रवासी सोयीसुविधांपासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : चंद्रपूर ते नागपूर मार्गावर स्थानिक शिवाजी चौकाजवळ नवीन बसस्थानक उभारण्यात आले. परंतु, मुलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे हे बसस्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे.
सिंदेवाही येथे १९९६ मध्ये बसस्थानक सुरू झाले. विशेष म्हणजे, येथील बसस्थानक मराठवाडा पॅटर्नप्रमाणे बांधण्यात आले. बसस्थानकावर सहा प्लॅटफार्म आहेत. बसस्थानकामधील पंखे नेहमी बंद असतात. परिसरात पथदिव्यांची व्यवस्था आहे. या दिव्यांचा प्रकार कमी पडत असल्याने हायमॉस्ट लावणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात जनतेला थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. बसस्थानक परिसरात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे दुचाकी वाहने याच परिसरात कुठेही ठेवल्या जातात. १५ वर्षांपासून बसस्थानकाची रंगरंगोटी करण्यात आली नाही. त्यामुळे बसस्थानक जीर्ण अवस्थेत दिसून येत आहे. परिसरात बरीच जागा रिकामी पडून आहे. पावसाळ्यात या जागेवर पाणी साचून राहते. बसस्थानक सभोवताल टिनाची संरक्षक भिंत आहे. टिन तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्या जागेवर विटांची संरक्षक भिंत बांधून दुकानाचे गाळे बांधल्यास चहा व फळांचे दुकान, स्टेशनरी, रसवंती यासारखे छोटे व्यवसाय सुरू होवू शकतात. पूर्वी नागपूरला जाण्यासाठी मूल येथून सिंदेवाहीमार्गे तीन बसेस सुरू होत्या. मात्र, काही वर्षांनंतर त्या बसफेºया बंद करण्यात आल्या. नागपूरसाठी प्रवासी मिळत नाही, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात आली. पण, खासगी वाहनांत प्रचंड गर्दी दिसून येते.
लोकप्रतिनिधींची निष्क्रियता
शहरात अनेक समस्या कायम आहेत. यावर स्थानिक लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेतात. केवळ राजकीय स्वार्थी पुढे ठेवूनच आंदोलने करण्याची प्रवृत्ती वाढू लागली. त्यामुळे सार्वजनिक हिताचे प्रश्न जै-थे आहेत. खासगी बसेसची स्पर्धा लक्षात घेऊन बदलत्या काळानुसार बसस्थानकातील मूलभूत सुविधांमध्ये वाढ केल्यास परिवहन महामंडळाच्या वाहनांमधूनच प्रवास करणाºयांची संख्या वाढू शकते. पण, लोकप्रतिनिधीच निष्क्रीय असल्याने समस्यांमध्येच वाढ होत आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

Web Title: Recognition of Sindhivahi bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.