खासदारांकडून कर्मचाºयांची कानउघाडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 11:39 PM2017-09-22T23:39:04+5:302017-09-22T23:39:16+5:30
शासकीय प्रशासकीय विभागाशी संबंधित विविध समस्यांविषयी सांगोपांग विचार विनियम तसेच त्यावर तोडगा काढण्याच्या हेतूने पंचायत समिती सावली येथे खासदार अशोक नेते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : शासकीय प्रशासकीय विभागाशी संबंधित विविध समस्यांविषयी सांगोपांग विचार विनियम तसेच त्यावर तोडगा काढण्याच्या हेतूने पंचायत समिती सावली येथे खासदार अशोक नेते यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. सदर आढावा बैठकीत विविध कामांची माहिती जाणून घेताना काही अधिकारी व कर्मचारी यांची बनवाबनवी लक्षात घेवून खासदार यांनी त्यांना धारेवर घेत चांगलीच कानउघाडणी केली.
सदर आढावा बैठकीचे आयोजन गुरुवारला पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आले. सदर आढवा बैठकीच्या अध्यक्षस्थानी चिमूर- गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते होते. यावेळी मंचावर तहसीलदार उषा चौधरी, संवर्ग विकास अधिकारी अमोल भोसले, ठाणेदार स्वप्नील धुळे इत्यादी अधिकारी हजर होते.
भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल, न.प. बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, भाजपा जिल्हा सचिव मुद्दमवार, जि.प. सदस्य मनिषा चिमूरकर, योगिता डबले, उपसभापती तुकाराम ठिकरे, पं.स. सदस्य विजय कोरेवार, रवी बोलीवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार नेते म्हणाले, अनेक मागासवर्ग व्यक्तीचे जीवनमान अगदी निम्नस्तरावर आहे. त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अधिकारी- कर्मचारी वर्गानी तन्मयतेने कार्य करावे, आदिवासी बांधवांच्या कल्याणाकरिता विविध शासकीय योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवून त्यांना याकडे वळविण्याची आग्रही भूमिका तुमची असायला पाहिजे.
तसेच शिक्षण- आरोग्यविषयक समस्येवर तोडगा काढण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले. तहसीलदार यांनादेखील विविध कल्याणकारी कामानिमित्त सूचना केल्या. यावेळी कर्मचारी- अधिकारी आपली बाजू मांडताना अडखळत असल्याने त्यांची बनवाबनवी खासदार यांच्या लक्षात येताच त्यांची चांगलीच कानउघडाणी केली.