सन्मान निधी योजनेसाठी दीड लाख शेतकऱ्यांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 10:05 PM2019-07-02T22:05:39+5:302019-07-02T22:06:48+5:30

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी मोठ्या प्रमाणात माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्यांनी अद्याप नावाची नोंदणी केली. त्यांनी ग्रामसेवक व तलाठ्यांकडे द्यावी. आतापर्यंत दीड लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली. राजुरा येथील आढावा बैठकीत ते बोलत होते.

Record of 1.5 lakh farmers for the Sanman Nidhi Scheme | सन्मान निधी योजनेसाठी दीड लाख शेतकऱ्यांची नोंद

सन्मान निधी योजनेसाठी दीड लाख शेतकऱ्यांची नोंद

Next
ठळक मुद्देकुणाल खेमणार : राजुरा येथे प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेविषयी मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी मोठ्या प्रमाणात माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्यांनी अद्याप नावाची नोंदणी केली. त्यांनी ग्रामसेवक व तलाठ्यांकडे द्यावी. आतापर्यंत दीड लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली. राजुरा येथील आढावा बैठकीत ते बोलत होते.
केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत क्षेत्र मर्यादेची अट शिथिल केली. जवळपास सर्व शेतकºयांना योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षभरात एकून ७ हजार २०० कोटीपेक्षा अधिक रक्कम जमा होणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याची ही योजना असून सविस्तर माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मुख्य सचिवांनी सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी नुकतीच वरोरा येथे बैठक घेऊन सर्व महसूल अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिलेत. विभागीय आयुक्तांना या संदर्भात कालबद्ध उद्दिष्टपूर्ती अपेक्षित आहे. अपलोड करण्यात आलेल्या नावांचा दररोज आढावा घेतला जात असून प्रमुख अधिकाऱ्यांकडे तालुक्यांची पाहणी करणे आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली, असेही जिल्हाधिकारी डॉ. खेमणार यांनी सांगितले.
जिल्ह्यामध्ये १५ तालुक्यात यासंदर्भात मोहीम राबविण्यात येत आहे. अपात्रतेसाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांमध्येदेखील शेतकºयांची नोंद केली जात आहे. यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला असेल, जे करदाता असतील, शासकीय सेवा ,पदाधिकारी, निवृत्तीवेतन धारक, पती-पत्नीच्या दोघांचे नाव असेल, माहिती देण्यास त्यांनी नकार दिला असेल अथवा आपसी वादामध्ये जमीन असेल अशा सर्वांच्या नोंदी घेतल्या जात आहेत. पात्र कुटुंबाला प्रतिवर्ष सहा हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार असून ते दोन हजार रुपये याप्रमाणे तीन टप्प्यात देण्यात येणार आहे.
वनहक्क पात्र शेतकऱ्यांना मिळणार लाभ
ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे त्या सर्वांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठी आपल्या नावाची नोंद करावी. शेतकऱ्यांसाठी आता हेक्टरची मर्यादा ठेवण्यात आली नाही. त्यामुळे ज्या खातेदाराच्या नावाने जमीन आहे. त्यांनी आपली नोंद करणे आवश्यक आहे. वनहक्क कायद्यांतर्गत जिल्हा समितीने पात्र केलेल्या शेतकरी कुटुंबाचा देखील या योजनेत समावेश करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Web Title: Record of 1.5 lakh farmers for the Sanman Nidhi Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.